AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रील सुनेशी साखरपुडा, ‘मी टू’मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत ‘संस्कारी बाबू’जी?

आपल्या भूमिकांमुळे 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख मिळवलेले अभिनेते आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे. आलोक नाथ यांनी विविध चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याचसोबत त्यांचं खासगी आयुष्य सतत चर्चेत राहिलं आहे.

रील सुनेशी साखरपुडा, 'मी टू'मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत 'संस्कारी बाबू'जी?
Alok NathImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2024 | 1:47 PM
Share

टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ हे आज (10 जुलै) त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे आलोक नाथ गेल्या काही काळापासून प्रकाशझोतात नाहीत. त्यांनी 1980 मध्ये ‘रिश्ते-नाते’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी बाबूजींची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्याने पुढेही त्यांना अशाच भूमिका मिळाल्या आणि त्यांची ओळखच ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून झाली. आलोक नाथ यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही काळापासून ते मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर आहेत.

आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप

आलोक नाथ यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप झाले होते. निर्माती आणि लेखिका विनता नंदा यांनी आलोक यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीसुद्धा त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, “जर मी एखाद्या मुलीची छेडछाड केली असेन, तर ती 25 वर्षांनंतर त्याचा खुलासा का करतेय? ती त्याचवेळी याबद्दल का बोलली नाही?” हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र या घटनेनंतर ते पुन्हा इंडस्ट्रीत दिसले नाहीत. विनता नंदा यांनी केलेल्या आरोपांविरोधात काही ठोस पुरावे न मिळाल्याने तो केस बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर CINTAA मधून आलोक नाथ यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

रील लाइफ सुनेशी साखरपुडा

आलोक नाथ यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, ‘बुनियाद’ या मालिकेत काम करताना त्यांचा जीव अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यावर जडला होता. या मालिकेत नीना गुप्ता यांनी आलोक नाथ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, अशीही चर्चा होती. मात्र काही कारणास्तव या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर आलोक नाथ यांनी 1987 मध्ये आशु सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. त्या ‘बुनियाद’ या मालिकेच्या प्रॉडक्शन असिस्टंट होत्या.

आलोक नाथ यांचं खासगी आयुष्य बरंच वादग्रस्त राहिलं आहे. 2017 मध्ये त्यांचा मुलगा शिवांग हा दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे चर्चेत होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. दंड भरल्यानंतर त्यांच्या मुलाची सुटका झाली होती.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता