धर्मेंद्र यांना सर्वात जास्त कोणत्या ब्रँडची दारू आवडायची? स्वत:च सांगितला होता तो किस्सा
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं आहे, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वसा घेतला, धर्मेंद्र यांना दारू खूप आवडायची त्याबद्दलचा एक किस्सा त्यांनी सांगितला होता.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं आहे, ते 89 वर्षांचे होते. त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यांचा जन्म पंजाबमध्ये 1935 साली झाला होता. धर्मेंद्र यांच्यावर व्हिले पार्ले येथील स्मशान भूमिमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यांनी त्यांना मुखाग्नी दिला. सर्वांनाच माहिती आहे की, धर्मेंद्र यांना दारू खूप आवडायची पण तुम्हाला हे माहीत आहे का? की धर्मेंद्र हे कोणत्या ब्रँडची दारू सर्वात जास्त पीत होते, कोणत्या दारूचा ब्रँड त्यांच्या सर्वात जास्त आवडीचा होता, याबाबत स्वत: धर्मेंद्र यांनी एक किस्सा सांगितला होता.
बॉलिवूड क्षेत्रातील जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना दारूची खूप आवड होती. असंही म्हटलं जातं की त्यांना दारूचं व्यसन लागलं होतं. एकदा तर ते एक नाही दोन नाही तर तब्बल 12 बॉटल दारू पिले होते. त्यांनी स्वत: एकदा हा किस्सा सांगितला होता. हा किस्सा सांगताना धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं की, त्यावेळी शोलेचं चित्रिकरण सुरू होतं. या चित्रिकरणाच्या वेळी त्यांनी एकाच दिवसामध्ये तब्बल 12 बॉटल दारू पिली होती, धर्मेंद्र हे त्याकाळात कॅमेरामनच्या पाठिमागे बसून दारू पीत होते.
कोणत्या दारूचा ब्रँड आवडायचा?
धर्मेंद्र हे बॅगपायपर दारूच्या ब्रँडचे ब्रँड अॅम्बेसेडर होते, मात्र त्यांना ही दारू आवडत नव्हती. रिपोर्ट्सनुसार धर्मेंद्र यांना स्कॉच व्हिस्की हा दारूचा ब्रँड सर्वात जास्त आवडत होता. ते नेहमी ब्लॅक डॉग, टीचर्स, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल सारख्या ब्रँडची दारू पीत होते. यामध्ये त्यांना सर्वात जास्त ब्लॅक लेबल नावाचा दारूचा ब्रँड पसंत होता. ज्याला ते नेहमी ब्लॅकी असं म्हणत असत.
तीनशे पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम
धर्मेेंद्र हे बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते होते, त्यांनी तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम केलं. त्यांनी तीनशे पक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा शोले हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
