AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये काही सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; ना महेश बाबू, ना रणबीर, हे तर..

'रामायण' या चित्रपटात भगवान विष्णूंची भूमिका कोणी साकारली आहे, यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. काहींनी विविध अंदाजसुद्धा वर्तवले आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित हा बिग बजेट चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

'रामायण'च्या ट्रेलरमध्ये काही सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; ना महेश बाबू, ना रणबीर, हे तर..
कोणी साकारली ही भूमिका?Image Credit source: Youtube
| Updated on: Jul 31, 2026 | 9:44 AM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विविध भूमिकांची झलक पहायला मिळते. एकीकडे रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम आणि परशुराम अशा दुहेरी भूमिकेनं सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे, तर दुसरीकडे ट्रेलरमधील प्रभू विष्णू यांच्या एका झलकनेही प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. ट्रेलरमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी दिसलेली ही भूमिका नेमकं कोण साकारतंय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सोशल मीडियावर नेटकरी त्यावरून विविध अंदाज व्यक्त करत आहेत.

भगवान विष्णू यांची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ राज जैन असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या लोकप्रिय पौराणिक मालिकेत सौरभने भगवान कृष्णा यांची अविस्मरणीय भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतही भगवान विष्णूची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘रामायण’मधील या दृश्यात दिसणारी व्यक्ती तोच आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

नेटकऱ्यांच्या दुसऱ्या एका गटाने हा चेहरा टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबूचा असू शकतो, असंही म्हटलंय. विशेष म्हणजे, महेश बाबू सध्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटात काम करत आहे. भारतातील पौराणिक कथांवर आधारित हा चित्रपट आहे. यावरूनच अनेकजण त्याला या भूमिकेशी जोडत आहेत. याव्यतिरिक्त एक तिसरी शक्यताही समोर येत आहे. रणबीर कपूर स्वत: भगवान विष्णूची भूमिका साकारणार असेल, असं तिसऱ्या गटाने म्हटलंय. रणबीरने आधीच हे स्पष्ट केलं होतं की तो या चित्रपटात भगवान विष्णूचे अवतार असलेल्या प्रभू श्रीराम आणि परशुराम या दोघांच्याही भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रणबीरनेच भगवान विष्णूचीही भूमिका साकारली असेल, असा तर्क काहींनी लावला आहे.

‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर 30 जुलै 2026 रोजी पहाटे 4.15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर आणि लंकापती रावणाच्या भूमिकेतील अभिनेता यशने सर्वांनाच थक्क केलं आहे. या चित्रपटात रणबीर आणि यश यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळणार असून त्याची एक झलक ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये दिसली.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद