AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पद्मभूषण पुरस्कार मिळाला, तरी धर्मेंद्र यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही, मोठे कारण समोर!

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले असूनही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.

पद्मभूषण पुरस्कार मिळाला, तरी धर्मेंद्र यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही, मोठे कारण समोर!
dharmendra deathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 11:36 PM
Share

Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. धर्मेंद्र यांचे कुटुंबीयदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. त्यांचे हे काम लक्षात घेता त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. परंतु तरीदेखील त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. असा निर्णय नेमका का घेण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यामागचे कारणही आता समोर आले आहे.

राजकीय सन्मान का मिळाला नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्या निधनाबाबतची माहिती प्रशासनाला उशिराने देण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून अगोदर तसा प्रस्तावर सरकारला पाठवावा लागतो. त्यानंतर सरकार या प्रस्तावाला मंजुरी देते. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी स्वारस्य दाखवले नाही. धर्मेंद्र यांच्या निधानाची माहिती माध्यमांनादेखील उशिराने देण्यात आली. धर्मेंद्र यांच्यावर लवकर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

बॉलिवुडमधील कलाकारांनाही उशिराने समजले

माध्यमे तसेच बॉलिवूड जगतालाही धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती उशिराने समजली. धर्मेंद्र यांचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात असताना त्यांचे निधन झाल्याचे सर्वांना समजले. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यादेखील थेट स्मशानभूमीतच दाखल झाल्या. अमिताभ बच्चन, आमीर खान यासारखे दिग्गज कलाकारही थेट स्मशानभूमीत पोहोचले. शाहरुख खान तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोहोचला.

2012 साली मिळाला पद्मभूषण पुरस्कार

दरम्यान, धर्मेंद्र यांचे सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना 1997 साली फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2012 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी शासकीय प्रक्रिया पार न पाडल्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमानात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...