AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sweetu | निरागस चेहरा, भाबडं हास्य, स्वीटूचा बालपणीचा क्यूट फोटो पाहिलात का?

अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिने लहानपणीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला (Sweetu Anvita Phaltankar childhood photo)

Sweetu | निरागस चेहरा, भाबडं हास्य, स्वीटूचा बालपणीचा क्यूट फोटो पाहिलात का?
स्वीटू फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर
| Updated on: Apr 08, 2021 | 10:15 AM
Share

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. वजनदार स्वीटूने सर्वांच्या मनात घर केलं आहे. स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिने लहानपणीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Yeu Kashi Tashi Me Nandayala Fame Sweetu Zee Marathi TV Actress Anvita Phaltankar shares cute childhood photo on instagram)

स्वीटू साकारणारी अन्विता फलटणकर इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सेटवरील फोटो ती अनेक वेळा शेअर करत असते. नुकताच तिने आपला बालपणीचा क्यूट फोटो शेअर केला आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव झाला. मुख्य भूमिकेत असलेल्या वजनदार स्वीटूने आपल्या निरागस आणि सोज्वळ लूकने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. बालपणापासून तिच्या चेहऱ्यावरचे हे भाबडे भाव लक्ष वेधून घेतात.

‘मशरुमच्या आकाराची मुलगी.. जिला जगाची काहीच फिकीर नव्हती… मात्र तिला एकच गोष्ट माहित होती, की तिला हाक्का नूडल्स आवडतात…’ असं कॅप्शन देत #throwbackthursday या हॅशटॅगसह अन्विताने फोटो शेअर केला आहे. जोडीलाचे #thatgirlwithchubbycheeks आणि #MiniMe असे दोन हॅशटॅग्सही तिने जोडले आहेत.

View this post on Instagram
(Sweetu Anvita Phaltankar childhood photo)

A post shared by Anvita Phaltankar ? (@anvita_phaltankar)

अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.

अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ निमित्ताने तिने पहिल्यांदाच टीव्हीवर मुख्य भूमिका साकारली. स्वीटूच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे.

संबंधित बातम्या :

लतिका, स्वीटू ते वनिता खरात… बॉडी शेमिंगच्या कानफटात खेचणाऱ्या नायिका

पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?

(Yeu Kashi Tashi Me Nandayala Fame Sweetu Zee Marathi TV Actress Anvita Phaltankar shares cute childhood photo on instagram)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.