AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लतिका, स्वीटू ते वनिता खरात… बॉडी शेमिंगच्या कानफटात खेचणाऱ्या नायिका

आठ वाजता स्वीटू, नऊ वाजता लती, प्राईम टाईमच्या मराठी मालिकांमध्ये सध्या प्लस साईजच्या नायिकांची चलती... (Marathi Serials Fat Leading Actress )

लतिका, स्वीटू ते वनिता खरात... बॉडी शेमिंगच्या कानफटात खेचणाऱ्या नायिका
अक्षया नाईक, वनिता खरात, अन्विता फलटणकर
| Updated on: Mar 29, 2021 | 4:12 PM
Share

मुंबई : 36-24-36, चवळीची शेंग, झिरो फिगर… मुलींच्या सौंदर्याच्या निकषांमध्ये तिची देहयष्टी हा कायमच चर्चेचा विषय असतो. मुलगा कसाही असला तरी चालेल, मात्र मुलगी कमनीय बांध्याचीच हवी. बारीक, सडपातळ या सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांची चिरफाड करणाऱ्या काही नायिका सध्या छोटा पडदा गाजवत आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ () मालिकेतील लतिका काय, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayala) मालिकेतील स्वीटू काय, किंवा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) गाजवणाऱ्या विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) आणि वनिता खरात (Vanita Kharat) काय. प्राईम टाईमच्या मालिकांमध्ये प्लस साईजच्या नायिकांची चलती आहे. (Marathi Serials Fat Leading Actress Sweetu Latika Sundara manamadhye Bharli Vanita Kharat)

हिंदी मालिकांमधून मराठीत ट्रेण्ड

कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिकाने पहिल्यांदा जाडसर नायिकेचा ट्रेण्ड मराठीत आणला. याआधी हिंदीमध्ये ‘देखो मगर प्यार से’, ‘ढाई किलो प्रेम’ यासारख्या मालिकांमधून हे कथानक पाहायला मिळालं होतं. अगदी ‘वजनदार’ सारख्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती भोईरने हा विषय मराठीत हाताळलाही. तर डान्सिंग क्वीनच्या ताज्या सिझनमध्ये वजनदार नृत्यांगनांची स्पर्धाही भरवली गेली. मात्र अलिकडच्या काळात प्लस साईज नायिकेला केंद्रस्थानी ठेवून आलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही पहिलीच मालिका म्हणायची.

लतिकाच्या चेहऱ्यावरील गोडवा लक्षवेधी

अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) ‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये लतिका म्हणजेच लतीच्या भूमिकेत आहे. अक्षयाच्या चेहऱ्यावरील गोडवा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. अक्षयाने याआधी ये ‘रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत अनन्याची भूमिका साकारली होती. अक्षया प्रशिक्षित नृत्यांगना आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे. जेव्हा बॉडी शेमिंगचा मुद्दा येतो, तेव्हा तीही म्हणते, चल हट.

‘सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचं कथानकच फिटनेस फ्रीक अभिमन्यू आणि वजनदार लतिका यांच्याभोवती फिरतं. फक्त शरीरच नाही, तर मेंदूही फिट असावा लागतो, असं लतिका प्रोमोमध्ये सांगताना आपण पाहिलंय. नुकत्याच झालेल्या कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये लतिकाच्या व्यक्तिरेखेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा सन्मान मिळाला. यातूनच प्रेक्षकांकडून वजनदार व्यक्तिरेखांना पसंती मिळत असल्याचं दिसतं.

स्वीटूच्या निरागस आणि सोज्वळतेला लोकप्रियता

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. हिरो आणि हिरोईनमध्ये नेहमीप्रमाणेच विभिन्नता आहे. हिरो फीट, तर हिरॉईन फॅट, हिरो गडगंज श्रीमंत, तर हिरोईन गरीब. मुख्य भूमिकेत असलेल्या वजनदार स्वीटूने आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) साकारत आहे.

अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ निमित्ताने तिने पहिल्यांदाच टीव्हीवर पदार्पण केलं. स्वीटूच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. (Marathi Serials Fat Leading Actress Sweetu Latika Sundara manamadhye Bharli Vanita Kharat)

बोल्ड अँड ब्यूटीफूल वनिता खरात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची विजेती असलेली वनिता खरात सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या न्यूड फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता तिने पुन्हा एक बोल्ड फोटोशूट केले. प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत, मनात कोणताच संकोच न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देते.

काही दिवसांपूर्वीच वनिता खरातने आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळतग सेमी न्यूड फोटो शेअर केला होता. वनिता खरातने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना एक पोस्टही लिहिली होती. वनिता म्हणते की, मला माझ्या प्रतिभेचा, पॅशनचा, आत्मविश्वासाचा,  शरीराचा अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!!’ वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केले होते.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात या चित्रपटात वनिताने शाहीद कपूरच्या घरी काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. प्रसिध्द होण्यासाठी फक्त एकच सीनच पुरेसा असतो, हे वाक्य वनिताबद्दल खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर धावली, पण याच सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

संबंधित बातम्या :

Zee Marathi Awards | स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी

अभिमन्यूला सोडून लतिका-दौलतची जमली जोडी, लाडक्या ‘सुंदरा’चा ‘वाथी कमिंग’ धमाल डान्स पाहिलात का?

पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?

(Marathi Serials Fat Leading Actress Sweetu Latika Sundara manamadhye Bharli Vanita Kharat)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.