AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल समजताच..; नाजूक विषयावर झायेद खान पहिल्यांदाच बोलला

वडील संजय खान आणि झीनत अमान यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल अभिनेता झायेद खानने बऱ्याच वर्षांनंतर मौन सोडलं आहे. इंडस्ट्रीत एकेकाळी संजय खान आणि झीनत अमान यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल समजताच..; नाजूक विषयावर झायेद खान पहिल्यांदाच बोलला
Zayed Khan and Sanjay Khan and Zeenat AmanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2026 | 8:56 AM
Share

अभिनेता झायेद खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध कुटुंबातून येत असून त्याचे वडील संजय खान हे दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. तर आई झरीन खानसुद्धा अभिनेत्री होत्या. संजय खान यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलंय. परंतु ते अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले होते. एकेकाळी बॉलिवूडमध्ये संजय खान यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. आता बऱ्याच वर्षांनंतर त्यांचा मुलगा झायेद खानने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. झायेद आणि अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान ही त्यांची मुलं आहेत.

संजय खान यांनी करिअरच्या शिखरावर असताना दुसऱ्या धर्मातील अभिनेत्री झरीन कतरक यांच्याशी लग्न केलं होतं. पारसी वंशाच्या असलेल्या झरीन यांनी संजय खान यांच्याशी लग्न केल्यानंतर आपलं आडनाव बदलून खान असं ठेवलं होतं. झायेदचा जन्म जरी सधन कुटुंबात झाला असला तरी वैयक्तिक जीवनात, नातेसंबंधांमध्ये त्याने बरेच चढउतार पाहिले आहेत. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत तो त्याच्या आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याला वडील संजय खान यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि झीनत अमानसोबतच्या नात्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता.

वडिलांच्या अफेअरच्या प्रश्नावर उत्तर देताना झायेद खानने सांगितलं की जेव्हा तो लहानाचा मोठा होत होता, त्यावेळी अशा बातम्यांमुळे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर वाईट परिणाम झाला होता. “तो एक असा काळ होता, जेव्हा स्टार्सना प्रत्येक दिवशी केमिस्ट्रीशी डील करावं लागलं होतं. ही काही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची नोकरी नव्हती. ती लोकं सेटवर रोमान्स करत होते, नाती बनत होती. मी इतकंच म्हणू शकतो की आपण जसा विचार करतो, गोष्टी नेहमीच तशा नसतात”, असं तो पुढे म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

“लहानपणी मला फार काही जाणवलं नाही. परंतु मी किशोरवयात असताना मला वडिलांच्या अफेअर्सबद्दल समजलं होतं. परंतु माझ्या वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी आणि आम्हा सर्वांसाठी जे काही केलंय, त्याच्या तुलनेत मी त्यावर कोणतंही मत व्यक्त करण्याच्या स्थितीत नाही. राहता राहिला प्रश्न जगाचा.. तर मला त्याने काही फरक पडत नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.

विवाहित संजय खान यांचं अभिनेत्री झीनत अमानसोबत अफेअरच्या जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. चित्रपटाच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीक वाढली होती आणि काही वर्षांपर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केल्याचंही म्हटलं जातं. ‘धुंध’ आणि ‘अब्दुल्ला’ या चित्रपटांदरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर विवाहित संजय खान यांनी झीनत अमान यांच्याशी गुपचूप दुसरं लग्न केल्याचंही म्हटलं जातं. परंतु लग्नाच्या काही वेळानंतर या दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि ते विभक्त झाले.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.