Christmas Cake Recipe : नाताळसाठी बनवा ड्रायफ्रूट केक, अशी आहे सोपी रेसीपी

ख्रिश्चन समाजाबरोबरच इतर समाजातील लोकही ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होऊ लागले आहेत. ख्रिसमसचा आनंद एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी ख्रिश्चन घरांमध्ये केक बनवण्याची खास परंपरा आहे. या ख्रिसमसमध्ये तुम्हालाही घरी केक बनवायचा असेल तर ड्रायफ्रूट केक हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Christmas Cake Recipe : नाताळसाठी बनवा ड्रायफ्रूट केक, अशी आहे सोपी रेसीपी
ड्राय फ्रुट केकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 8:23 PM

मुंबई : ख्रिसमसच्या (Christmas 2023) सेलिब्रेशनमध्ये गोडवा आणायचा असेल तर ड्रायफ्रूट केक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आता भारतातही ख्रिसमसची क्रेझ वाढली आहे. ख्रिश्चन समाजाबरोबरच इतर समाजातील लोकही ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होऊ लागले आहेत. ख्रिसमसचा आनंद एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी ख्रिश्चन घरांमध्ये केक बनवण्याची खास परंपरा आहे. या ख्रिसमसमध्ये तुम्हालाही घरी केक बनवायचा असेल तर ड्रायफ्रूट केक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करताना, ड्राय फ्रूट केकची चव या सेलिब्रेशनमध्ये आणखी गोडवा आणण्यासाठी पुरेशी ठरेल. चला जाणून घेऊया ड्राय फ्रूट केक बनवण्याची सोपी रेसिपी.

ड्राय फ्रूट केक बनवण्यासाठी साहित्य

पीठ – 1 कप दही – १/२ कप दूध – 1/4 कप बेकिंग पावडर – 1 टीस्पून बेकिंग पावडर – 1/2 टीस्पून दूध पावडर – 2 चमचे सुका मेवा (मिश्रण) – 4-5 चमचे व्हॅनिला एसेन्स – 1 टीस्पून बदाम स्लिव्हर्स – 2 टीस्पून तूप – १/२ कप साखर पावडर – 1/2 कप मीठ – 1 चिमूटभर

ड्राय फ्रूट केक रेसिपी

ड्राय फ्रूट केक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पीठ चाळून घ्या. आता बेकिंग पावडर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा चाळून एका बाऊलमध्ये ठेवा आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. यानंतर चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. यानंतर, दुसरी वाटी घ्या आणि त्यात दही, साखर पावडर आणि तूप तुम्ही हवे असल्यास वनस्पती तेल देखील वापरू शकता घाला आणि चांगले मिसळा.

हे सुद्धा वाचा

दुसरी रेसीपी

साहित्य

दोन वाट्या गव्हाचं पीठ, दीड वाटी गूळ, पाऊण वाटी बटर, पाऊण वाटी दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, दीड टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका, टूटी-फ्रुटी आवश्यकतेनुसार आणि फ्रुट ज्यूस

कृती

सर्वात आधी बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका रात्रभर फ्रुट ज्यूसमध्ये भिजवून ठेवा. एका बाऊलमध्ये दही, बटर, बारीक करून घेतलेला गूळ एकत्र करून घ्या. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करुन घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, सुंठ पावडर एकत्र करून घ्या. हे मिश्रण गुळाच्या मिश्रणात थोडं-थोडं घाला. आता भिजवलेले ड्राय फ्रुट तयार बॅटरमध्ये मिक्स करा. एका भांड्याला बटर लावून घ्या. केकच्या भांड्यामध्ये तयार बॅटर ओता. त्यावर टूटी-फ्रुटी आणि ड्रायफ्रुट टाका. त्यानंतर हे भांडं गरम केलेल्या प्रेशर कुकरच्या मधोमध स्टँडवर ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाका. हा केक 40 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद केल्यानंतर टूथपिकच्या मदतीनं केक पूर्णपणे शिजला आहे की नाही हे तपासा. केक तयार झाल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर केक चाकूच्या मदतीनं कापून घ्या. हेल्दी ख्रिसमस केक खाण्यासाठी तय्यार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.