AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumabai : गणपती विसर्जन दणक्यात अन् स्वच्छता मोहिमही जोमात, विसर्जनानंतर अवघ्या काही तासात राजकीय नेतेही लागले कामाला..!

गणरायाला निरोप देताना समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य हे होतेच. शिवाय पहाटेपर्यंत मिरवणूका ह्या सुरु असल्याने स्वच्छका करणे तसे जिकीरीचेच असते. त्यामुळे सर्व मूर्त्यांचे विसर्जन झाल्यानंतर आता सकाळी 8 च्या सुमारास ही मोहिम सुरु केली जाते. गिरगाव चौपाटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला होता.

Mumabai : गणपती विसर्जन दणक्यात अन् स्वच्छता मोहिमही जोमात, विसर्जनानंतर अवघ्या काही तासात राजकीय नेतेही लागले कामाला..!
गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत मनसे पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
| Updated on: Sep 10, 2022 | 3:16 PM
Share

मुंबई : दोन वर्षानंतर यंदा (Ganpati Visarjan) गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. शनिवारी सकाळपर्यंत येथील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी (Ganesha Devotee) गणेश भक्त मोठ्या संख्येने दाखल होत होते. विसर्जनानंतर या भागात (Empire of Filth) घाणीचे साम्राज्य हे दरवर्षीचे चित्र असते, पण यंदा राजकीय नेत्यांबरोबर सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या भागात स्वच्छता मोहिमेला सुरवात केली होती. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच चौपाट्या अगदी चकाचक पाहवयास मिळत होत्या. शिवाय एनसीसी च्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला होता.

अमृता फडवणीसांकडून जुहू बीच स्वच्छ

ज्या प्रमाणे यंदा गणेश उत्सवामध्ये गणेश भक्तांचा उत्साह दिसून आला अगदी त्याप्रमाणेच स्वच्छता मोहिमेतही गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते. तर याच भक्तांचा उत्साह वाढवण्याचे काम राजकीय नेते आणि इतरांनी केले आहे. येथील जुहू चौपाटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.

गिरगाव चौपाटीवर मंत्री गिरीश महाजन

गणरायाला निरोप देताना समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य हे होतेच. शिवाय पहाटेपर्यंत मिरवणूका ह्या सुरु असल्याने स्वच्छका करणे तसे जिकीरीचेच असते. त्यामुळे सर्व मूर्त्यांचे विसर्जन झाल्यानंतर आता सकाळी 8 च्या सुमारास ही मोहिम सुरु केली जाते. गिरगाव चौपाटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला होता. NCC आणि स्काऊट गाईड यांच्या विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवली जात होती. त्यामध्ये महाजन सहभागी झाले होते.

बोलले ते मनसेने करुन दाखवले

दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होत असतानाच मनसेने उद्या चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नाहीतर किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष गोळा करून ते महापालिकेकडे सोपवण्यातही आले आहे. सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी मनसेचे अमित ठाकरेही उपस्थित होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.