AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर चुकूनही करू नका ‘या’ चुका, भोगावे लागतील गंभीर परिणाम

कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपल्यामुळे एका 21 वर्षाच्या तरूणाला त्याचा एक डोळा गमवावा लागल्याची एक धक्कादायक घटना अमेरिकेत नुकतीच घडली. हा प्रकार समोर आल्यावर सर्वजण हैराण झाले आहेत. कॉन्टॅक्ट लेन्सबाबत होणाऱ्या काही चुका जाणून घेऊया.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर चुकूनही करू नका 'या' चुका, भोगावे लागतील गंभीर परिणाम
| Updated on: Feb 22, 2023 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे लोकांची दृष्टी (vision) कमी होत आहे. यामुळेच बऱ्याच लोकांना लहान वयातच चष्मा लावावा लागतो. तथापि, चष्मा अनेकदा आपला लूक खराब करतो, ज्यामुळे लोक कधीकधी चष्मा (spects) घालणे टाळतात. अशा परिस्थितीत कॉन्टॅक्ट लेन्स (contact lens) लावण्याकडे तरूणांचा कल झपाट्याने वाढला आहे. आजकाल लोक आपले सौंदर्य टिकवण्यासाठी चष्म्याऐवजी लेन्सचा वापर करू लागले आहेत. पण ते वापरताना अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घ्यावी लागते.

अमेरिकेत घडला धक्कादायक प्रकार

नुकतेच कॉन्टॅक्ट लेन्सबाबत निष्काळजीपणाचे असेच एक प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. खरंतर, अमेरिकेत राहणाऱ्या 21 वर्षीय मायकल याला डोळ्यात लेन्स घालून झोपणं फार महागात पडलं. रात्रभर लेन्स लावून झोपल्यानंतर तो सकाळी उठला तेव्हा त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गायब झाल्याचे दिसून आले. खरंतर फ्लॅश खाणाऱ्या परजीवीने माइकचा डोळा खाल्ला होता, त्यामुळे त्याची दृष्टी गेली. माईकचा एक छोटासा निष्काळजीपणा त्याला खूप महागात पडला. कॉन्टॅक्ट लेन्सबाबत काही चुका होतात, ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेत, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

– जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर चुकूनही त्या घालून झोपू नका. असे केल्याने डोळ्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढतो.

– कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ घालून वावरू नका. तुमचे काम पूर्ण झाल्यावर लेन्स काढून ठेवा. त्याचा दीर्घकाळ वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते.

– तुम्ही लेन्स वापरत असाल, तर वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या लेन्स डोळ्यांसाठी योग्य आहे की नाही हे त्यांच्याकडून वेळोवेळी तपासून घ्या. लेन्सच्या एक्सपायरी डेट बद्दल काळजी घ्या कारण कालबाह्य झालेल्या लेन्स तुमच्या डोळ्याससाठी हानिकारक असू शकतात.

– कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यासाठी लेन्सेस नियमितपणे उकळलेल्या (गार) पाण्याने स्वच्छ करा आणि लेन्स लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्या.

– लेन्स डोळ्यात लावताना चुकून जर जमिनीवर पडली तर ती चुकूनही तशीच डोळ्यांत घालू नका. कारण जमिनीवर पडल्याने अनेक प्रकारचे जंतू त्यात प्रवेश करतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

– पोहणे, डोळ्यांचा संसर्ग, डोकेदुखी, आगीभोवती असताना कॉन्टॅक्ट लेन्स न वापरण्याचा प्रयत्न करा. तसेच, जर तुम्ही सायकल चालवताना लेन्स घातल्या असाल तर सनग्लासेस आणि हेल्मेट यांचा नक्की वापर करा.

– लेन्स डोळ्यात लावण्यापूर्वी आणि वापर करू झाल्यानंतर नेहमी द्रावणाने स्वच्छ करा. तसेच लेन्स लावल्यामुळे तुम्हाला जळजळ किंवा इतर कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.