कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका?; आयुष मंत्रालयांची बालकांसाठी गाईडलाईन जारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. (Corona third wave in india)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका?; आयुष मंत्रालयांची बालकांसाठी गाईडलाईन जारी
सांकेतिक फोटो

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे. (Ayush Ministry’s guidelines to protect children from Covid-19)

नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे बालरोग तज्ज्ञ डॉ. एस. राजगोपाल यांनी ‘टीव्ही9 भारतवर्ष’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. मात्र, तरीही एक विशेष किट तयार करण्यात आलं आहे. त्याच्या सेवनानंतर मुलांची प्रतिकारशक्ती अधिक वाढते, असं सांगितलं.

आयुष 64चा वापर

गाईडलाईननुसार लहान मुलांचं त्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यात 10 ते 15, 5 ते 10 आणि 5 वर्षापासून त्या खालील मुलांचे गट निर्माण केले आहेत. मुलांना या वयोगटानुसारच औषध देण्यास सांगण्यात आलं आहे. ताप आला तर आयुष 64 हे औषध देण्याचं गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आल्याचं राजगोपाल यांनी सांगितलं.

आयुर्वेद बिहेविअर प्रोटोकॉल

मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनीही बिहेविअर प्रोटोकॉलचा वापर सुरू करावा, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार आई-वडिलांना आयुर्वेदिक औषधांचा खास वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच कोमट पाण्याने गुळण्या करण्याचा सल्लाही लहान मुलांना देण्यात आला आहे, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं.

लहान मुलांकडे लक्ष द्या

आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमध्ये लहान मुलांच्या हालचालींकडेही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केवळ तापच नव्हे तर मुलांची अॅक्टिव्हिटी कमी झाली तरी तात्काळ डॉक्टरांना दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मोहरीच्या तेलाचा वापर

गाईडलाईनमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करणे बंधनकारक केलं आहे. मोहरीचं तेल कोरोना संरक्षण कवच म्हणून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. या तेलामुळे नाकातून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचंही बोललं जात आहे. लहान मुलांना या तेलाचा दररोज वापर करण्यास सांगण्यात आलं आहे.

मुलं एकटी राहू नयेत

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांना साधारणपणे आयसोलेशनमध्ये पाठवलं जातं. अशावेळी लहान मुलांना आयसोलेट केलं तर त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने पालकांसाठी वेगळी गाईडलाईन जारी केली आहे. (Ayush Ministry’s guidelines to protect children from Covid-19)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update :पुण्यात दिवसभरात 257 नव्या कोरोना रुग्णांची वाढ 

पुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र निचांकी

(Ayush Ministry’s guidelines to protect children from Covid-19)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI