AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : ‘लवंग-जायफळ’ आहे तुमच्या आरोग्याला वरदान; जाणुन घ्या, लवंग अन जायफळचे आरेाग्यदायी फायदे!

लवंग-जायफळ रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते आणि घसा खवखवण्यासारख्या आरोग्य समस्यांपासून आराम देऊ शकते. लवंग आणि जायफळ एकत्र कसे वापरता येईल याबाबत तुम्हाला असल्यास, त्याचा तुम्ही योग्य वापर करून शकता. लवंग जायफळ एकत्रित वापरल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.

Health : ‘लवंग-जायफळ’ आहे तुमच्या आरोग्याला वरदान; जाणुन घ्या, लवंग अन जायफळचे आरेाग्यदायी फायदे!
लवंग आरोग्यासाठी फायदेशीर आहे, Image Credit source: TV9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 12, 2022 | 4:49 PM
Share

मुंबई : आयुर्वेदात आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. या उपायांमध्ये आहाराशी निगडीत अनेक प्रभावी टिप्स्‌चा देखील समावेश होतो. आयुर्वेद शास्त्रानुसार, काही घरगुती उपायांचे सेवन केल्याने आपण दीर्घकाळ तंदुरुस्त (long term healthy) आणि निरोगी जिवन जगु शकतो. केवळ आयुर्वेदातच नव्हे तर अॅलोपॅथीमध्येही जायफळ आणि लवंग यांचे आरोग्यासाठी विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दोन घटकांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याचे दुहेरी फायदे आपणास मिळू शकतात. घरातील जुन्या जाणत्या गृहीणी अर्थात आजीबाईंच्या बटव्यात जायफळ आणि लंवग (nutmeg and clove) याला अनन्य साधारण महत्व आहे. मुलांच्या संगोपनाशी या देाघा घटकांचा मुबलक प्रमाणावत (Abundant use) वापर केला जातो. भुख वाढवणे असो की, सर्दी दूर करण्यासाठी जायफळ आणि लवंग या दोन्हींचा योग्य वापर केल्यास, अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतात.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

कोरोनाचा प्रभाव अजूनही आपल्यामध्ये आहे, आणि नुकत्याच चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतांना या परिस्थितीत लवंग आणि जायफळाच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही निरोगी राहू शकता. जायफळ आणि लवंग रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयोगी असून घसा खवखवण्या सारख्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापरले जातात.

लवंग-जायफळचे एकत्र मिश्रण

एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात दोन ते तीन लवंगा टाका. तसेच त्यात अर्धा चमचा जायफळ पावडर टाका. लक्षात ठेवा दोघांचा प्रभाव गरम असतो परिणामी उन्हाळ्यात जरा जपुनच वापर करावा. लवंग जायफळ मिश्रणात साधे पाणी टाकून तसेच राहु द्यावे काही वेळाने एकजिन्सी मिश्रण झाल्यावर ग्रहण करावे. या मिश्रणाने आपल्या शरीरात जादु प्रमाणे फायदे आपण अनुभवू शकतात.

सर्दी खोकला होतो गायब

बहुतांश वेळी थंडगरम पाण्यामुळे किंवा थंडपेयांमुळे उन्हाळ्यातही खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवतो, मात्र जायफळ आणि लवंगाच्या सेवनाने त्यापासून सुटका होऊ शकते. खोकला किंवा सर्दी झाल्यास लवंग आणि जायफळापासून तयार केलेले पाणी सकाळी लवकर प्यावे. शक्यतो झोपेतून उठताच उपाशी पेाटी घेतल्यास अधीक चांगले. उन्हाळ्याच्या हंगामात, तुम्हाला ते दिवसातून एकदाच प्यावे लागेल आणि हे सुमारे तीन ते पाच दिवस करावे लागेल.

संसर्गं दूर होतो

जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती क्षीण, कमकुवत झालेली असते, तेव्हा शरीरात अनेक आरोग्य समस्यांसह आजार जडण्याची अधीक भिती असते. अशा वेळेस लवंग आणि जायफळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी उपायात गणले जातात, कारण त्यात अँटीऑक्सिडंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म सारख्या प्रमाणात यात आढळून येतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संरर्गं असल्यास काही दिवसातच तो दूर होतो.

घसा खवखवणे

कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकांनी लवंग आणि जायफळापासून बनवलेल्या काढ्यांचा भरपूर प्रयोग केला असला तरी, प्रमाणापेक्षा अधीक वापर नकोच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. बेचैन करणारी घशाची खवखव लवंग जायफळाच्या वापरातून दूर करता येते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मात्र, ते रोज प्यायल्याने तुम्ही इतर आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता. म्हणुन आराम पडताच वापर थांबवायला विसरु नका.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....