AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय ती मागणी योग्यच, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर ठाकरे गटाची भूमिका समोर! सावंतांनी इतिहास सांगितला

आजची सुनावणी सुरू असताना अरविंद सावंत सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना सिब्बल यांनी केलेली मागणी योग्य आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.

होय ती मागणी योग्यच, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर ठाकरे गटाची भूमिका समोर! सावंतांनी इतिहास सांगितला
arvind sawant and shiv sena election symbolImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 6:36 PM
Share

Shiv Sena Election Symbol : शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या बाजूने निष्णात वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत होते. त्यांचा युक्तिवाद आता संपला आहे. युक्तिवाद संपवताना सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे. शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आम्हाला देण्यात यावे. हे चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवण्यात यावे, असे सिब्बल म्हणाले आहेत. त्यांच्या या मागणीनंतर शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हेच काय होणार? असे विचारले जात आहे. दरम्यान, याच मागणीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिब्बल यांनी केलेली मागणी योग्यच आहे, असे ते म्हणाले आहेत.

धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्या किंवा…

आजची सुनावणी सुरू असताना अरविंद सावंत सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना सिब्बल यांनी केलेली मागणी योग्य आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवलं गेलं पाहिजे अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. मला वाटतं ती मागणी अतिशय योग्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेणार ते बघुया, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना..

पक्षचिन्ह गोठवल्याची मागणी केली तर काय झालं? हे चिन्ह आम्हाला मिळत नसेल तर ते गोठवलं गेलं पाहिजे, असे मतही अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, तेव्हापासून आहे. मग शिवसैनिकांच्या भावना दुखावणार नाहीत का? असा प्रश्न पत्रकारांनी सावंत यांना केला. यावर उत्तर देताना आमच्याकडे अगोदर ढाल आणि तलवार हे निवडणूक चिन्ह होते, असे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.

मशालीवर आमचं एक जुणं…

कधीकाळी आमच्याकडे मशाल हे चिन्हदेखील होतं. मशालीवर आमचं एक जुणं गाणं आहे. मधल्या काळात आमचे निवडणूक चिन्ह हे धनुष्याबाण होते. हेच चिन्ह परत मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. न्यायालयाने आम्हाला पर्याय विचारला. त्यावर हे निवडणूक चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवून टाका, अशी आम्ही मागणी केली असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

Follow Us
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?