मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे हे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. फळांमध्ये नैसर्गिक रित्या साखरेचे प्रमाण असते जे कृत्रिम साखरेप्रमाणे रक्तातील साखर वाढवते. पण काही फळ ही मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत जाणून घ्या कोणती आहे ती फळे.

मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
फळे - फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 6:07 PM

मधुमेह ही आज सामान्य आरोग्य समस्या बनली आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे कुठल्याही आव्हान अपेक्षा कमी नाही. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कमी GI असलेले पदार्थ खावे लागतात. रक्तातील साखरेची पातळी संतुलित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्याचा हृदय,मूत्र पिंड आणि इतर अवयवांवर थेट परिणाम होतो. मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून त्यावर नियंत्रण मिळवता येते. अशी काही फळे आहेत ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अशाच फळांबद्दल जे केवळ स्वादिष्ट नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात.

जांभूळ

जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान मानले गेले आहे. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. ज्यामुळे ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. जांभळाच्या बियांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे गुणधर्म देखील असतात. जांभूळ तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा त्याच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवून पाण्यासोबत देखील घेऊ शकता.

सफरचंद

सफरचंद मध्ये फायबर आणि पेक्टिन नावाचे घटक असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यास देखील प्रोत्साहन देते. एक मध्यम आकाराचे सफरचंद स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

नासपती

नासपती मध्ये उच्च फायबर आणि जीवनसत्वे असतात. जे पचन मंद करून रक्तातील साखरेचे पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. ते सॅलडमध्ये खाणे किंवा डायरेक्ट खाणे देखील फायदेशीर ठरते.

काळे द्राक्ष

काळया द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यात नैसर्गिक साखर कमी प्रमाणात असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी काळी द्राक्ष फायदेशीर आहेत. तुम्ही दिवसभरात कधीही दहा ते बारा काळी द्राक्ष खाऊ शकतात.

पपई

पपई हे एक असे फळ आहे ज्यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त प्रमाणात फायबर असते. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते याशिवाय पचनक्रिया सुधारते. तुम्ही नाश्त्यात पपई खाऊ शकतात किंवा स्मुदी बनवून देखील खाऊ शकता.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी काही टिप्स

  1. संतुलित आहार घ्या: फळांचा आहारात समावेश करण्यासोबतच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांना आहारात प्राधान्य द्या.
  2.  नियमित व्यायाम करा: दररोज 30 मिनिटे चालणे किंवा योगासने करणे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
  3. रक्तातील साखरेची पातळी तपासत रहा: नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासल्याने तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत होते.
  4. भरपूर पाणी प्या: पाणी जास्त प्रमाणात पिल्यामुळे चयापचय व्यवस्थित राहते.
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.