तुम्ही दररोज आहारात सलाडचे सेवन करतात? जाणून घ्या आयुर्वेदाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
फिट राहण्यासाठी आपल्या आहारात सलाड समाविष्ट करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु आपण दररोज सलाड खावे का? या संदर्भात आयुर्वेदाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया...

आजकाल प्रत्येकजण फिट राहण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्येत आहार घेण्यापासून ते जीवनशैलीबद्दल खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे आता बहुतांश लोकं ही कोणत्या वेळी काय खात आहेत याकडे खूप लक्ष देऊ लागली आहेत. यासोबतच आपण पहिले कि काहीजण लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात अधिक प्रमाणात सलाडचे सेवन करतात. खरं तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते. अशा तऱ्हेने लंच किंवा डिनरसोबत सॅलडचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने सलाड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
तसेच तुम्ही नियमित सलाडचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर असे बरेच लोकं आहेत जे रोजच्या आहारात जेवणाआधी सलाडचे सेवन करतात. तर काही लोकं जी जेवणासोबत सलाडचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का जेवणासोबत सलाडचे सेवन करावे की नाही? तुम्हाला जर याचे उत्तर माहित नसेल तर आयुर्वेदाने याविषयी काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.
सलाड जेवणासोबत खावे की नाही, जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतो?
एका रिपोर्टनुसार तुम्ही जर सलाडचे योग्य प्रकारे सेवन केले नाही तर तुमच्या शरीराला याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. वजन कमी करणारे बहुतेक लोकं त्यांच्या आहारात सलाडचा समावेश करतात, परंतु त्याचे योग्य सेवन कसे करावे हे माहित असणे खूप महत्वाचे आहे. कारण सलाड हे कच्च्या पदार्थांपासून बनवले जाते.म्हणून सलाड आणि शिजवलेले अन्न हे कधीही एकत्र खाऊ नयेत. कारण शरीरात सलाड आणि शिजवलेले अन्न पचवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते.
अशावेळी जर तुम्ही रोज सलाडचे तसेच अन्नाचे एकत्र सेवन केल्यास त्याचा तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदात असा सल्ला देण्यात आला आहे की, वेगवेगळ्या वेळी अन्न आणि सलाड खावे जेणेकरून तुमच्या शरीराचे पचनही योग्य होईल आणि सलाडमध्ये वापरलेल्या फळ भाज्यांचा तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल.
सलाड खाण्याची योग्य वेळ कोणती?
जर तुम्हाला जेवणासोबत सलाडचे सेवन करायचे असेल तर ते थोडावेळ स्टीम करून जेवणासोबत खावं. त्यात जर तुमच्याकडे स्टीम करण्याचा पर्याय नसेल तर तुम्ही सलाड जेवणाआधी खावे व थोड्यावेळाने जेवणे हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरेल. याशिवाय पचनसंस्थेला सलाड पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे सकाळ किंवा दुपारीच याचे सेवन करावे, असेही डॉक्टरांनी सांगितले. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
