AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उगच का व्यायामाला महत्व आहे… चमत्कारी फायद्यांसह या आजारांपासून रहा दूर

गंभीर आजारांचा धोका गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे, ज्यासाठी व्यायामाचा अभाव हे मुख्य कारण मानले जाते, त्यामुळे नियमित व्यायामाची सवय तुम्हाला या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

उगच का व्यायामाला महत्व आहे... चमत्कारी फायद्यांसह या आजारांपासून रहा दूर
योगासने
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 11:47 AM
Share

पुरेशी झोप, सकस आहार व नियमित व्यायाम (daily exercise) या गोष्टी निरोगी व सुदृढ शरीरासाठी अत्यंत आवश्‍यक समजल्या जातात. पिळदार व लवचिक शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्‍यक असते. हल्लीच्या धावपळीने भरलेल्या जीवनात शरीराला तंदुरुस्त (fitness) ठेवणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. वाढते प्रदुषण, बदलती जीवनपध्दती या सर्वांमध्ये शरीराला आजारापासून दूर ठेवायचे असल्यास दररोज व्यायाम करणे महत्वाचे आहे. बरेच लोक शारीरिक तंदुरुस्ती आणि वजन नियंत्रणाच्या उद्देशाने व्यायाम करतात, परंतु या शिवायदेखील व्यायामाचे अनेक फायदे आहेत. नियमित व्यायामाची सवय अनेक गंभीर आजारांचा (diseases) धोका कमी करण्यासही उपयुक्त ठरते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने तंदुरुस्त राहण्यासाठी आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्याच प्रमाणे नियमित व्यायामामुळे मानसिक आरोग्यदेखील चांगले राहते. रोजच्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश केल्यास, आपण अनेक वर्ष शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो.

हृदयविकारापासून संरक्षण

नियमित व्यायामाची सवय हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायामामुळे हृदयाचेही आरोग्य तंदुरुस्त राहत असते. रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. रक्तप्रवाह योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहते. हृदय तसेच शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. नियमित व्यायामामुळे रक्तदाब आणि ‘ट्रायग्लिसराइड’ची पातळी देखील कमी राहते.

निद्रानाशाची समस्या होते दूर

नियमित स्वरुपात व्यायाम केल्याने निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज चांगली झोप घेतात त्यांना विविध प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो. त्याच प्रमाणे त्यांना दिवसभर उत्साही वाटत असते. याशिवाय, नियमित व्यायामामुळे पुरुषांमध्ये ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’चा धोकाही कमी होतो.

उत्तम मानसिक आरोग्य

गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. व्यायामादरम्यान आपले शरीर अनेक असे रसायने निर्माण करीत असते की ज्यामुळे आपल्यात उत्साह निर्माण होत असतो. त्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत मिळत असते. तणाव आणि नैराश्याचे धोके कमी करण्यासाठी व्यायामाचे फायदे देखील आहेत.

सकारात्मकता निर्माण होते

नियमित व्यायाम केल्याने आपल्या विचारांमधील नकारात्मकता नष्ट होउन सकारात्मक उर्जा निर्माण होत असते. त्यामुळे ही आपल्या प्रगतीसाठीही फायदेशीर ठरत असते. त्यामुळे नियमित व्यायाम करावा.

संबंधित बातम्या : 

द्राक्षं आवडतात म्हणून अतिरेक नको, शरीरावरील दुष्परिणाम माहितीयं का?

झोप लागत नाही? हा घ्या जालीम उपाय.. मधुमेहासह हे 6 आजार होतील दूर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.