Corona | …तर तुमचा टूथब्रश तातडीने बदला, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

तुम्ही कोरोना आजारातून नुकतंच बाहेर पडला असाल आणि घरी आराम करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे (change toothbrush after recover from corona).

Corona | ...तर तुमचा टूथब्रश तातडीने बदला, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
प्रातिनिधिक फोटो (साभार : फेसबुक)
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 8:41 PM

मुंबई : तुम्ही कोरोना आजारातून नुकतंच बाहेर पडला असाल आणि घरी आराम करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना आजारातून बाहेर पडल्यानंतर लगेच तुम्ही तुमचा टूथब्रश चेंज करा. कारण कोरोनाचा पुन्हा संसर्ग रोखण्यास त्याला मदत होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय अनेक कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये देखील हे काटोकोरपणे पाळलं जात आहे. काही ठिकाणी रुग्णांना टूथब्रश दिला जातो. त्यानंतर ज्यादिवशी त्यांना डिस्चार्ज मिळतो त्यादिवशी त्यांना दुसरा टूथब्रश दिला जातो. त्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ नये, हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे (change toothbrush after recover from corona).

भारतात कोरोनाचा उद्रेक, काळजी घेणं जरुरी

भारतात कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. तर काही ठिकाणी बेड्स मिळणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आपण सावधानता बाळगायला हवी. याशिवाय एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा तो संसर्ग होऊ नये म्हणूनही खूप काटोकोरपणे नियमांचं पालन करायला हवं. यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा टूथब्रश बदलावा. मोठमोठ्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे (change toothbrush after recover from corona).

किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?

एखाद्या व्यक्तीने नुकतंच कोरोनावर मात केली. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून तो घरी आला असेल तर त्याने तातडीने आपला टूथब्रश बदलावा. यामुळे फक्त त्याच्यासाठीच पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार नाही तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. अनेक घरांमध्ये तर एकच वॉशरुम असतं. त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतर टूथब्रश बदलला तर अशा घरांमधील सदस्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञ आणखी काय सांगतात?

कोरोनातून बाहेर पडल्यानंतरही ज्या लोकांना खोकला, सर्दी आणि ताप येत असेल अशा व्यक्तींनी तर आपला टूथब्रश नक्की बदलावा. अशा नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या 20 दिवसांनंतर टूथब्रश आणि टंग क्लिनीर बदलावं, असं तज्ज्ञ सांगतात. तसेच टूथब्रशला बॅक्टेरिया फ्री ठेवायचं असेल तर ओरल हायजीन ठेवणं जास्त जरुरीचं आहे, असा सल्ला देखील तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.

हेही वाचा : मोठी बातमी ! गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.