Health Tips : आपल्या ‘या’ सवयी कमकुवत हाडांचे कारण असू शकतात, वाचा! 

बहुतेक लोकांना असे वाटते की, वाढत्या वयानुसार, हाडे कमकुवत होतात. परंतु आपण आजूबाजूला बरेच ज्येष्ठ लोक पाहतो, जे वयस्कर असून सुध्दा त्यांचे हाडे मजबुत असतात.

Health Tips : आपल्या 'या' सवयी कमकुवत हाडांचे कारण असू शकतात, वाचा! 
कमकुवत हाडे

मुंबई : बहुतेक लोकांना असे वाटते की, वाढत्या वयानुसार, हाडे कमकुवत होतात. परंतु आपण आजूबाजूला बरेच ज्येष्ठ लोक पाहतो, जे वयस्कर असून सुध्दा त्यांचे हाडे मजबुत असतात. आपले हाडे कमकुवत होण्याची अनेक कारणे आहेत. हाडे कमकुवत होण्यासाठी विशिष्ट असे कुढलेही वय नसते. हाडे कमकुवत होण्यामागे आपल्या बऱ्याच सवयी देखील कारणीभूत ठरू शकतात. मात्र, या सवयींवर नियंत्रण ठेवल्याने आपण कमकुवत हाडांची समस्या दूर करू शकतो. (Follow these tips to strengthen bones)

धूम्रपान

तंबाखूचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होतात. हे केवळ आपल्या फुफ्फुसांना हानिकारकच नाही तर आपली हाडे कमजोर करतात. मुक्त रॅडिकल्स आपले हाडे बनविणार्‍या पेशी मारतात. धूम्रपान केल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढतो आणि कॅल्सीटोनिनचे नुकसान होते. या व्यतिरिक्त जर तुमच्या हाडात आधीच फ्रॅक्चर झाले असेल तर धूम्रपान केल्याने तुमच्या रक्तपेशी खराब होतात. ज्यामुळे पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही.

शारीरिक हालचाली

जे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात, त्यांची हाडे लवकर कमकुवत होतात. जर स्नायू चांगल्या प्रकारे कार्य करत असतील तर हाडे मजबूत होतात. म्हणूनच मजबूत हाडांसाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर वेगवान चालावे आणि त्यामुळे हाडे मजबूत होतील.

जास्त मद्यपान

जास्त मद्यपान केल्याने शरीरात कॉर्टिसॉलचे अधिक उत्पादन होते. याशिवाय हे टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढवते. हा संप्रेरक शरीरासाठी खूप महत्वाचा आहे.

मीठ जास्त प्रमाणात खाणे

जास्त प्रमाणात मीठ खाण्यामुळे हाडांची घनता कमकुवत होते. आपण जास्त मीठ खाल्ल्यास कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते. खरं तर, दिवसातून फक्त एक ग्रॅम मीठ खाल्ल्याने स्त्रियांच्या हाडांची घनता एक टक्का कमी करू शकतात. म्हणून, दररोज 2300 मिलीग्रामपेक्षा कमी मीठ घेण्याचा सल्ला दिला जातो. तर लोकांनी एका दिवसात 1500 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

दिवसभर घरीच राहणे चुकीचे

व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीशिवाय हाडे कमकुवत होऊ शकतात. आपल्या शरीरावर सूर्यप्रकाशापासून सर्वाधिक व्हिटॅमिन डी मिळतो. जर आपण बाहेर वेळ घालवला नाही तर व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. आपण बाहेर जाऊ शकत नसल्यास, अंडी, सॅमन आणि आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टी खा.

संबंधित बातम्या : 

Health Tips : कच्चं दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक; वाचा काय नुकसान होऊ शकतं!

Weight Loss : लिंबू पाणी पिण्यामुळे वजन कमी कसे होते ‘हे’ जाणून घ्या!

(Follow these tips to strengthen bones)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI