AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंड्यातील हिरव्या बल्कबाबत कधी ऐकलंय का?, कशामुळे बदलतो अंड्याचा रंग; वाचून थक्क व्हाल!

अंड्यातील पिवळ्या बल्क बदल आपण सर्वांनीच ऐकले आहे. पण आता अंड्यामध्ये हिरवा बल्क देखील दिसून आला आहे.

अंड्यातील हिरव्या बल्कबाबत कधी ऐकलंय का?, कशामुळे बदलतो अंड्याचा रंग; वाचून थक्क व्हाल!
हिरवा बल्क असलेली अंडी
| Updated on: May 19, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : अंड्यातील पिवळ्या बल्क बदल आपण सर्वांनीच ऐकले आहे. पण आता अंड्यामध्ये हिरवा बल्क देखील दिसून आला आहे. गेल्या वर्षी केरळमधील मल्लापुरममधील गावात राहणाऱ्या शीहाबुद्दीन यांच्या कोंबड्यांनी हिरवा बल्क असलेली अंडी दिली होती. यानंतर या हिरव्या रंगाचा बल्क असलेल्या कोंबड्यांची चर्चा भारतात नव्हेतर संपूर्ण जगात झाली. (Have you ever heard of egg green yolk know the reason behind)

सर्वांसाठीच हे खूप आश्चर्यकारक होते. कारण कोंबडीच्या अंड्यांचा बल्क हा पिवळ्या रंगाचा असतो. त्यानंतर बरेच संशोधन देखील करण्यात आले. आता संशोधनातून समोर आले आहे की, कोंबडीच्या अंड्यातील बल्क नेमका हिरवा का होता. शीहाबुद्दीन यांनी एकूण सहा कोंबड्या पाळल्या आहेत. जेव्हा कोंबडीने हिरवा बल्क असलेले अंडे दिले त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. त्या कोंबडीचे आणि हिरवा बल्क असलेल्या अंड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली.

विशेष म्हणजे देश-विदेशातील अनेकांनी त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी शीहाबुद्दीन यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान केरळच्या पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाने (KVASU) देखील या कोंबड्यांच्या अंड्यात पिवळ्याऐवजी हिरवा बल्क कसा यावर अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे हिरवा बल्क असलेल्या अंड्याची चर्चा जेंव्हा सोशल मीडियावर झाली तेंव्हा अनेकांनी शीहाबुद्दीन यांच्या कोंबड्या खरेदी करण्यासाठी आॅफर देखील दिल्या.

egg 1

शास्त्रज्ञांनी अखेर शोध लावला

अंड्यातील बल्क हिरवा होता, ते अंडे शीहाबुद्दीन यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला खाल्ली नाहीत. मात्र, जेंव्हा त्या अंड्यामधून कोंबडीची पिल्ले बाहेर आली तेंव्ही त्यांना खात्री झाली की, ही अंडी खाण्यायोग्य आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की, या अंड्यांची चव सामान्य अंड्यांप्रमाणेच असते. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बर्‍याच लोकांनी त्यांच्याकडूनही या अंडीची मागणी केली. मात्र, त्यांनी ही हिरवी अंडी इतर कोणालाही दिली नाही. शीहाबुद्दीन यांनी लोकांना सांगितले होते की, जोपर्यंत शास्त्रज्ञ अंड्यातील बल्क हिरवा का आहे ? हे शोधत नाहीत तोपर्यंत ही अंडी कोणालाही देणार नाहीत.

अंड्यामध्ये हिरवा बल्क असण्याचे कारण शास्त्रज्ञाच्या अभ्यासातून एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली ती म्हणजे या कोंबड्यांना एक विशिष्ट प्रकारचे अन्न हे खाण्यासाठी देण्यात आले होते. त्याच कारणामुळे या कोंबड्याच्या अंड्यातील बल्क हा हिरवा झाला. कोंबड्यांना जास्तीत-जास्त अन्न हे हिरव्या रंगाचे देण्यात आले होते. हिरवी पाने, केळीची पाने इतर झाडांची पाने आणि पालक शिवाय तांदूळ, गहू, नारळाचा लगदा दिला जात होता. त्यामुळे या कोंबड्याचा अंड्यातील बल्क हिरवा झाला.

संबंधित बातम्या : 

Weight Loss : वजन कमी करायचंय?, वाचा अंडे

शाकाहारी लोकांसाठी खास अंड्याची निर्मिती केली जाणार

(Have you ever heard of egg green yolk know the reason behind)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.