Metabolism: मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय

मेटाबॉलिजम (चयापचय) म्हणजे , अन्नाद्वारे मिळणाऱ्या उर्जेचा शरीरातील पेशी कसा वापर करतात. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली यामुळे मेटाबॉलिजम बिघडू शकते.

Metabolism: मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय
मेटाबॉलिजम नसेल सुरळीत तर बिघडेल आरोग्य, करा हे उपाय Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 11:00 AM

नवी दिल्ली: मेटाबॉलिजम (Metabolism) अर्थात चयापचयाचा दर जितका जास्त असेल, तितक्या जास्त कॅलरीज तुम्ही बर्न करू शकाल. तुम्ही जितक्या जास्त कॅलरी (calories) बर्न करता, तितके तुमचे वजन कमी होते. बऱ्याच वेळेस डॉक्टर म्हणतात की जर शरीराचे मेटाबॉलिजम चांगले नसेल तर आपले आरोग्यही चांगले राहणार नाही. मेटाबॉलिजम जितके चांगले तितके शरीर विषारी पदार्थ आणि चरबी (burns fat) कमी करू शकेल. त्यासह, शरीर मूत्र आणि विष्ठेद्वारे शरीरातून वाईट पदार्थ सहजपणे काढून टाकते. मात्र, मेटाबॉलिजम चांगले नसेल तर मधुमेहासारखा आजार (health problem) होण्याचा धोका असतो.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली आणि झोपेचा बिघडलेला पॅटर्न यामुळे मेटाबॉलिजम खराब होऊ शकते. त्यामुळे पचनतंत्रही बिघडचे. ज्येष्ठ फिजिशिअन डॉ. कवलजीत सिंह यांच्या मते, मेटाबॉलिजम (चयापचय) म्हणजे , अन्नाद्वारे मिळणाऱ्या उर्जेचा शरीरातील पेशी कसा वापर करतात. या ऊर्जेमुळेच आपण आपली दैनंदिन कामे करतो.

शरीरात चयापचय प्रक्रिया चालू असते. हे नवीन पेशी तयार करण्यात मदत करते आणि खराब पदार्थ देखील शरीराबाहेर काढते. या स्थितीमध्ये हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप-2 मधुमेह तसेच सांधेदुखीची समस्याही उद्भवू शकते.

हे सुद्धा वाचा

मेटाबॉलिजमबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमजही आहेत. त्यापैकी एक भ्रम म्हणजे मेटाबॉलिजम चांगले ठेवण्यासाठी व्यक्तीने कमी (अन्न) खाल्ले पाहिजे. मात्र असे नाहीये. सर्व लोकांनी आपल्या शरीरानुसार कॅलरीचे सेवन केले पाहिजे . जे लोक जास्त व्यायाम करतात त्यांनी जास्त कॅलरींचे सेवन केले पाहिजे.

अन्न कमी केल्याने आपले शरीर योग्य स्थितीत राहील, असे होत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये मेटाबॉलिजम रेट हा वेगवेगळा असतो आणि त्याच पद्धतीने शरीरही काम करते. मात्र, ज्या व्यक्तीच्या शरीरात मेटाबॉलिजम योग्य पद्धतीने होणार नाही, त्या व्यक्तीला सतत काही ना काही आरोग्यासंदर्भातील त्रास होत राहील. अशा परिस्थितीत मेटाबॉलिजम योग्य राखणे खूप गरजेचे आहे.

असे ठेवा नियंत्रण

ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार यांच्या सांगण्यानुसार, मेटाबॉलिक समस्या (चयापचयाची समस्या) अनेकदा वयाच्या 30 व्या वर्षानंतर सुरू होते. मात्र ते योग्य ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी रोज व्यायाम करावा, तसेच खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी.

सतत एका जागी तासनतास बसून राहू नये. कामातून मधेमध्ये ब्रेक घेत रहावा. तसेच झोपेच्या बाबतीतही निष्काळजीपणा करू नये. प्रत्येक व्यक्तीला किमान 8 तास झोप गरजेची असते. झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक वेळ निश्चित करावी व ती काटेकोरपणे पाळण्याचाही प्रयत्न करावा. ग्रीन टीचे सेवन करावे आणि भरपूर पाणी प्यावे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.