AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ragi Benefits : झटपट वजन कमी करायचंय? आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन; आरोग्याला होतील अनेक फायदे

Ragi Benefits : आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम आणि जिम करतात. परंतु वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये नाचणीचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नाचणीमधील पोषक तत्वं तुमचं आरोग्य निरोगी ठेवम्यास मदत करते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर असते ज्यामुळे तुमच्यया आरोग्याला फायदे होतात.

Ragi Benefits : झटपट वजन कमी करायचंय? आहारात करा 'या' पदार्थाचे सेवन; आरोग्याला होतील अनेक फायदे
रागीचा फायदा
| Edited By: | Updated on: Jan 11, 2025 | 4:31 PM
Share

नाचणी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे अनेकजण आजही नाचणीच्या भाकरीला पसंती देतात. नाचणीमधील पोषक तत्वं तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नाचणीचे सेवन केल्यास तुमच्या हाडांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या नाचणी अत्यंत फायदेशीर ठरते.

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला निरोगी राहाण्यास मदत होते. फायबरमुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं राहातं ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही. याशिवाय नाचणीचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते. नाचणीमध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी हळूहळू वाढते. त्यासोबतच नाचणीचे थंडीमध्ये सेवन केल्यास तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उर्जा निर्माण होते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात स्नायूंची वाढ होते. नाचणीमधील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, लोह आणि कॅल्शियम तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

तुमच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी आणि दहीचा समावेश करू शकता ज्यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळण्यास मदत होईल. अनेकजण नाचणीची लापशी देखील बनवतात हा तुमच्यासाठी एक पौष्टीक ब्रेकफास्ट ठरू शकते. याच्या सेवनामुळे तुमच्या घरातील लहानमुलांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास मदत होते. अनेकजण नाचणीची पेज देखील बनवतात ज्यामुळे आजारपणामध्ये तुमच्या आरोग्याला भरपूर प्रमाणात ताकद मिळते. नाचणीचे सत्व चवीष्ट लागते आणि आरोग्याला फायदेशीर असते.

नाचणीचे आरोग्यदायी फायदे :

1) नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

2) नाचणीमधील फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते .

3)नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ॲनिमिया सारखे आजार दूर राहाते.

4)नाचणीमधील अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.