AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Headphone : मोठ्या आवाजात हेडफोनवर गाणी ऐकणं पडेल महागात, बहिरे होण्याचा धोका!

हेडफोन्सवर मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकणे कानांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा धोका संभवतो, असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे.

Headphone : मोठ्या आवाजात हेडफोनवर गाणी ऐकणं पडेल महागात, बहिरे होण्याचा धोका!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Jul 06, 2022 | 5:10 PM
Share

सध्याच्या धावपळीच्या, टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईल हा सर्वांची गरज बनला आहे. आणि त्याच मोबाइलला हेडफोन्सची (Headphone) जोड असते. फोनवर बोलण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी तसेच गाणी ऐकण्यासाठी हेडफोनला पसंती देतात. मात्र हेडफोनचा अती वापर आणि त्यावर मोठमोठ्याने गाणी ऐकण्याची सवय यामुळे कानांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बऱ्याच काळापर्यंत हेडफोन्सवर मोठ्या आवाजात गाणी (Loud Music) ऐकण्याच्या सवयीमुळे ऐकू येण्याची क्षमता कमी (Hearing Loss) होऊ शकते. हेडफोन्स हे कानांसाठी अतिशय घातक असतात व त्यामुळे गंभीर परिणामांना सामोर जावे लागू शकते. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे. यापूर्वीही अनेक रिसर्च आणि अभ्यासातून हेडफोन्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती समोर आली होती.

काय आहे निष्कर्ष?

फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिर्सच (INSERM)ने केलेल्या अभ्यासानुसार, फ्रान्समधील लोकांना हेडफोनमुळे बहिरेपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये दर चारपैकी एका व्यक्तीला कमी ऐकू येण्याची समस्या भेडसावत आहे आणि याचे मुख्य कारण आहे हेडफोनचा अतिरिक्त वापर. त्याशिवाय बिघडती जीवनशैली, सोशल आयसोलेशन आणि डिप्रेशनही या गोष्टीही त्याला कारणीभूत आहेत. या रिसर्चसाठी 18 ते 75 वयोगटातील 460 लोकांचा , त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला.

काय म्हणतात एक्स्पर्ट?

ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. शरद मोहन, यांच्या सांगण्यानुसार हेडफोन किंवा इअरफोनमधून 85dBपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच बऱ्याच कालावधीसाठी मोठा आवाज ऐकणेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात, ते बहिरेपणाची शिकार होऊ शकतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे कानाला इन्फेक्शनही होऊ शकते.

मोठ्या आवाजात गाणी ऐकणे हे फक्त कानांसाठी नव्हे तर हृदयासाठीही धोकादायक ठरू शकते. जेव्हा आपण मोठा आवाज ऐकतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोकेही वाढतात. सतत हेडफोन वापरल्याने ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बराच वेळ हेडफोन वापरल्याने चक्कर आल्यासारखे वाटणे, झोपेची समस्या, डोकेदुखी तसेच कानदुखीची समस्याही उद्भवू शकते.

बहिरेपणा टाळण्यासाठी उपाय काय?

  1. – जास्त काळासाठी हेडफोन वापरू नका. दिवसातून केवळ 60 मिनिटे हेडफोन/इअरफोन वापरा.
  2. – इअरफोन वापरताना आवाज नेहमी नॉर्मल (पातळीवर) ठेवा.
  3. – नेहमी चांगल्य क्वॉलिटीचे हेडफोन/इअरफोन वापरा.
  4. – इअरफोन वापरताना त्यासह इअरबड्सचाही वापर करा. ते कान सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.