AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यामध्ये कानामधील फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. या गोष्टींच्या घ्या काळजी जेणेकरून फंगल इन्फेक्शन होणार नाही.

पावसाळ्यामध्ये कानामधील फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 21, 2023 | 3:12 PM
Share

मुंबई : पावसाळ्याला सुरूवात होताच, सर्वच वयोगटात कानदुखीच्या समस्या सूरु होतात. कानासंबंधीत संसर्गाच्या तक्रारींनीडॉक्टरांकडे गेल्यावर कानांत संसर्ग झाल्याचे निदान होते. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत कान-नाक-घसा सर्जन डॉ. सुश्रृत देशमुख यांनी माहिती दिली आहे.

हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जिवाणू किंवा बुरशी (Bacteria or fungi) वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरते. जिवाणूंमुळे कानासंबंधीत संसर्ग वाढवतो. कानाचा संसर्ग झाला असेल तर वेदनेबरोबरच इतर समस्याही उद्भवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास वेदना वाढु शकतात. पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थांचे सेवन करु नका. त्यामुळे कानाचे दुखणे आणखी वाढू शकते.

संसर्गाची कारणे

सर्दी आणि फ्लू सोबत, अगदी किंचित ऍलर्जीमुळे संक्रमण होऊ शकते. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू हे कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण आहेत. पावसाळ्यात यांची झपाट्याने वाढ होते. पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. यासाठी तुम्ही कोरडे आणि स्वच्छ सुती कापड वापरू शकता.

इअरबड्स आणि कॉटन स्‍वॅबपासून दूर राहा, कारण ओलसर हवामानात कापसाचे स्‍वॅब बॅक्टेरिया अडकून तुमच्या कानात पसरू शकतात. इअरफोन्स वेळोवेळी साफ करून, निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. गळ्यात खवखव किंवा घशाचा संसर्ग झाल्यास त्यामुळेही कान दुखणे तसेच संसर्गाचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात कानात ओलावा राहिल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे कान कोरडे आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

लक्षणे कोणती?

कानात वेदना होणे, सूज येणे, लालसरपणा, नीट ऐकु न येणे, कानातून पांढरा , पिवळसर स्राव बाहेर पडणे, कान बंद पडणे, डोकेदुखी

काय उपचार कराल?

कानात वेदना किंवा कान भरलेला, जड जाणवत असेल तर त्याकडे तातडीने लक्ष द्या. लवकरात लवकर ईएनटी डॉक्टरांना दाखवा. वेळीच कानाची साधी तपासणी केल्यास निदान करता येऊ शकते. ऑडिओग्राम करून श्रवणशक्तीमध्ये काही बिघाड झाला असल्यास, कानात द्रव जमा झाला असल्यास त्याची खात्री करून घेता येऊ शकते.

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...