AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय

आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला ही लक्षणे जाणवू लागल्यावर समजा की आतड्यांचे आरोग्य बिघडू लागले आहे. यासाठी आजच्या या लेखात आपण आतडयांचे आरोग्य बिघडल्यावर कोणती लक्षणे जाणवतात व त्यावर कोणते उपाय करावे ते जाणून घेऊयात...

'या' लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 6:49 PM
Share

रोजच्या या धावपळीच्या आयुष्यात विशेषत: वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा खाण्यापिण्याचे भान राहत नाही, त्यामुळे अनेकदा आपले खाण्यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे हळुहळू पोटाचे, पचनाचे विकार डोके वर काढतात. त्यामुळे आतडयांशी संबंधित आजारांचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

आपल्या शरीरातील आतडया केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाही तर त्यांचा आपल्या एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा पचनाशी संबंधित समस्या उद्भवते तेव्हा शरीरात इतर समस्या उद्भवू लागतात. त्यात आपले शरीर सुद्धा जेव्हा आतड्यांचे आरोग्य बिघडते तेव्हा त्याआधी काही ना काही लक्षणे आपल्याला जाणवत असतात, आणि ही लक्षणे वेळीच ओळखली तर पुढील आजार थांबवता येतो.

जेव्हा आपले आतडे खराब असतात तेव्हा त्याची अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. ही लक्षणे ओळखून आपण योग्य उपचार करून ही समस्या वेळेत सोडवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण आतड्यांसंबंधी आरोग्य बिघडण्याची काही महत्त्वाची लक्षणे आणि ती सुधारण्याचे सोपे उपाय जाणून घेऊयात…

पचन समस्या

आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचे सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे पचन समस्या, जसे की-

बद्धकोष्ठता किंवा अतिसार – आतड्यांतील जीवाणूंच्या असंतुलनामुळे आतड्यांच्या हालचालींमध्ये अनियमितता येऊ शकते.

गॅस आणि पोटफुगी – आतड्यांमध्ये हानिकारक जीवाणूंची संख्या वाढल्याने पोटफुगी आणि गॅस होते.

आम्लपित्त आणि छातीत जळजळ – आतडयांमधील पाचक रसांचे असंतुलन आम्लपित्त ॲसिडिटीला कारणीभूत ठरू शकते.

वजनात अचानक बदल

डाएट न करता किंवा व्यायामात बदल न करता वजन वाढणे किंवा कमी होणे हे आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण असू शकते. आतड्यातील बॅक्टेरिया अन्नातून पोषक तत्वांचे शोषण आणि फॅट साठवण्यावर परिणाम करतात.

थकवा आणि झोपेच्या समस्या

आतडे आणि मेंदू यांच्यात खोल संबंध आहे. आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने सेरोटोनिनच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे निद्रानाश, सतत थकवा आणि मूड स्विंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्वचेच्या समस्या

आतड्यांमधील जळजळ किंवा बॅक्टेरियाचे असंतुलन त्वचेवर दिसून येते, जसे की मुरुमे, एक्जिमा, सोरायसिस आणि पुरळ.

अन्न इंटोलरेंस

ग्लूटेन किंवा दुग्धजन्य पदार्थांसारखे काही पदार्थ अचानक पचण्यास जड जातात तेव्हा हे देखील आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण असू शकते. हे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या कमतरतेमुळे होते.

वारंवार होणारे संक्रमण

आपल्या शरीरातील 70 % प्रतिकारशक्ती आतड्यांवर अवलंबून असते. जर तुम्हाला वारंवार सर्दी, लघवीचा संसर्ग किंवा इतर संसर्ग होत असतील तर ते आतड्यांचे आरोग्य खराब असल्याचे लक्षण असू शकते.

तोंडातून दुर्गंध येणे

तोंडाची स्वच्छता आपण प्रत्येकजण करत असतो. पण जेव्हा पोटात हानिकारक जीवाणूंची वाढ होते तेव्हा तोंडाची दुर्गंधी निर्माण करू शकते.

आतड्यांचे आरोग्य कसे सुधारायचे?

प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स घ्या. जसे की दही, किमची, केफिर ( हे एक पारंपारिक कोरियन खाद्यपदार्थ आहे, जो मुख्यत्वे कोबी आणि मुळा यांसारख्या भाज्या आंबवून बनवला जातो.) आणि केळी, लसूण इत्यादी फायबरयुक्त पदार्थ आतड्यांसाठी फायदेशीर आहेत.

प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचे सेवन कमी करा. हे हानिकारक जीवाणूंना प्रोत्साहन देतात.

भरपूर पाणी प्या त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य चांगले होण्यास मदत होते.

ताण कमी करा योगासने, ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या.

अँटीबायोटिक्सचा अतिरेकी वापर करू नका ते तुमच्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट करू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.