Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांची निगा राखण्यासाठी घरीच तयार करा हर्बल शाम्पू, जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची पद्धत आणि फायदे

त्वचा सोबत केसांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. ते स्वच्छ ठेवण्यासाठी लोक बाजारात मिळणारे शाम्पू वापरतात. पण या शाम्पू मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हर्बल शाम्पू वापरू शकता. जो घरी देखील तयार केला जावू शकतो.

केसांची निगा राखण्यासाठी घरीच तयार करा हर्बल शाम्पू, जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची पद्धत आणि फायदे
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 3:09 PM

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि रसायनांनी भरलेल्या शाम्पूच्या वापरामुळे अनेकांचे केस खराब होतात. बाजारात मिळणारे शाम्पू आणि केसांची निगा राखणारे उत्पादनांनमध्ये अनेकदा अनेक प्रकारची रसायने असतात. ते जास्त काळ वापरल्यास केस खराब होतात. त्यामुळे हर्बल शाम्पू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हर्बल शाम्पू केवळ केस स्वच्छ आणि पोषण करण्यास मदत करत नाही तर ते केसांची गुणवत्ता सुधारतात आणि केसांची नैसर्गिक चमक वाढवतात.

तुम्हालाही रासायनिक उत्पादने टाळायची असतील आणि हर्बल शाम्पू घरी तयार करायचा असेल तर जाणून घ्या हर्बल शाम्पू तयार करण्याची पद्धत. हर्बल शाम्पू बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. त्यात केस निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत. केस गळणे थांबवते आणि टाळूचे संक्रमण होण्यापासून संरक्षण करते. जाणून घेऊ त्या औषधी वनस्पती बद्दल ज्या तुम्ही तुमच्या हर्बल शाम्पू मध्ये वापरू शकता. हर्बल शाम्पू कसा तयार करायचा ते देखील जाणून घेऊ.

हर्बल शाम्पू बनवण्यासाठी आवश्यक औषधी वनस्पती रिठा दहा ते बारा, शिकेकाई पाच ते सहा तुकडे, आवळा पाच ते सहा नग, मेथीचे दाणे दोन चमचे, कडुलिंबाची पाने दहा ते पंधरा, कोरफडीचा गर दोन ते तीन चमचे, पाणी एक लिटर

शाम्पू बनवण्याची पद्धत हर्बल शाम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिठा, शिकेकाई, आवळा आणि मेथीचे दाणे एक लिटर पाण्यात रात्रभर भिजवावे लागतील. त्यामुळे त्याचे सर्व नैसर्गिक गुणधर्म पाण्यात मिसळतील. यानंतर सकाळी हे मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे उकळवा. उकळण्याने या औषधी वनस्पतीचे पौष्टिक घटक पाण्यात पूर्णपणे विरघळतात. ते थंड होऊ द्या आणि नंतर कापड किंवा गाळणीतून गाळून घ्या. तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही ते घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. जर तुम्हाला केसांना अधिक पोषण द्यायचे असेल तर तुम्ही गाळलेल्या मिश्रणात दोन ते तीन चमचे कोरफडीचा गर टाकू शकता.

अशा पद्धतीने करा वापर हा हर्बल शाम्पू ओल्या केसांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. पाच ते दहा मिनिटे केसांवर तसाच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. हा हर्बल शाम्पू एक आठवडा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवता येतो. याचा नियमित वापर केल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम लवकर दिसून येतो.

औषधी वनस्पतींचे फायदे रिठा: केस नैसर्गिक रित्या स्वच्छ करते., शिकाकाई: केस मजबूत आणि चमकदार बनवते., आवळा: केस गळणे कमी होते आणि केस वाढण्यास मदत मिळते., कडूलिंब: कोंडा दूर करण्यास मदत करते., मेथी: केसांना आद्रता देते आणि कोरडेपणा कमी करते.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.