AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चुकीच्या सवयींमुळे येऊ शकते अकाली वृद्धत्व… आजच बदला जीवनशैली

तरूण दिसण्यासाठी लोक विविध उपाय करतात, सर्वांनाच नितळ व चमकदार त्वचा हवी आहे, तरुण दिसण्यासाठी काही जण खास ट्रिटमेंटदेखील घेतात. याशिवाय आपल्या आहारातदेखील अमुलाग्र बदल करतात. परंतु एवढं केल्यावरही पदरी निराशा पडते. याचे खरे कारण तुमच्या काही चुकीच्या सवयींमध्ये दडले आहे.

‘या’ चुकीच्या सवयींमुळे येऊ शकते अकाली वृद्धत्व... आजच बदला जीवनशैली
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 15, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई : वाढत्या वयातही आपले तारुण्य खुलून दिसावे, आपल्या चेहरा तजेलदार व नितळ असावा, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला कायम तरुण (Young) राहायचे असते. दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी विशेषत: महिलांमध्ये खूप चढाओढ असते. यासाठी ते अगदी महागडे उपचार तसेच प्रोडक्टदेखील वापरतात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या (Health Experts) मते, प्रत्येक व्यक्तीला काही वाईट सवयी असतात ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. या सवयी केवळ आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नसतात तर अकाली वृद्धत्वालादेखील (Premature Aging) आमंत्रित करीत असतात. अशा स्थितीत तुम्ही तरुण वयातच म्हातारे दिसू लागतात, खालील चुकीच्या सवयी तुम्हालाही असतील तर वेळीच त्या बदला.

तणाव

कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त चिंता केल्याने लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. अशी लोकं कोणत्या ना कोणत्या मानसिक किंवा शारीरिक आजाराला बळी पडू शकतात. अनेकदा ही प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाही, पण तणाव हा एक अतिशय घातक आणि सायलेंट किलर ठरू शकतो. त्यामुळे दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर ताण घेणे टाळले पाहिजे.

पुरेशी झोप न घेणे

दररोज 7 ते 8 तास झोप न घेतल्यानेही अकाली वृध्दत्वाची समस्या निर्माण होउ शकते. पुरेशी झोप न लागण्याचा तणावाशी संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. पण काही लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे.

शारीरिक हालचाली न होणे

शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. व्यायाम न करणे किंवा दैनंदिन जीवनशैलीत शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत शरीराला लवकर आजार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले तारुण्य कमी होते.

योग्य आहार न घेणे

अकाली वृद्धत्वासाठी सकस आहार न घेणे हेदेखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. आहारतज्ज्ञ डॉ. अबरार म्हणतात, की 21 व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत. या गोष्टी आपल्या आयुर्मानात घट होण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे सकस आहार घेणे शरीरासाठी व तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक आहे.

धूम्रपान आणि मद्यपान

तणाव टाळण्यासाठी बरेच लोक दारू, तंबाखू किंवा मादक पदार्थांचे सेवन करू लागतात. यामुळे या सवयींकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. त्यांच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु त्याआधीच त्याचे सतत आणि जास्त सेवन आपल्याला वृद्धत्वाकडे वेगाने घेउन जात असते.

इतर बातम्या

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे

सावध व्हा! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, ‘या’ शहरांमधील मुलं होताय बाधित

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.