AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवायचेय, मग रोज प्या लाल मनुक्याचा ज्यूस

आपणही उच्चरक्तदाबाचे रुग्ण असल्यास व या त्रासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू इच्छित असाल तर दररोज मनुक्याचा रस प्या. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी मदत करते. (Want to control high blood pressure, then drink raisin juice daily)

उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवायचेय, मग रोज प्या लाल मनुक्याचा ज्यूस
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई : सध्या उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. इंग्रजीत याला ‘हायपरटेन्शन’ असे म्हणतात. हा आजार हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या द्रुतगतीमुळे होतो. या अवस्थेत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास, थकवा, छातीत दुखणे, डोकेदुखी असे इतर बरेच आजार धडकी भरवतात. यामध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मधुमेह यांचा समावेश आहे. या आजारावर उपचार करणारे स्पेशालिस्ट 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला रक्तदाब तपासणीची आवर्जून शिफारस करतात. त्याचबरोबर योग्य ते खाणे तसेच ताणतणावापासून दूर राहण्यासही सांगितले जाते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची चिंता करत बसने सोडून देण्याचा सल्ला दिला जातो. आपणही उच्चरक्तदाबाचे रुग्ण असल्यास व या त्रासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू इच्छित असाल तर दररोज लाल मनुक्याचा रस प्या. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी मदत करते. काही संशोधनात हे सिद्ध झाले आहे की उच्च रक्तदाब प्लमच्या सेवनाने नियंत्रित केला जाऊ शकतो. (Want to control high blood pressure, then drink raisin juice daily)

लाल मनुका म्हणजे काय?

मनुके अनेक नावांनी परिचित आहेत. याला हिंदीमध्ये अलुचा म्हणतात. इंग्रजीमध्ये याला प्लम म्हणतात. हे फळ लिचीसारखे आहे. त्याची चव खूप गोड आहे. अमेरिका आणि भारत यासह अनेक देशांमध्ये लाल मनुकाची लागवड केली जाते. या फळाचा वापर जाम तयार करण्यात जास्त प्रमाणात केला जातो. यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषत: उच्च रक्तदाबासाठी ते कोणत्याही औषधाइतकेच गुणकारी असते. यात पोटॅशियम आढळते. तज्ज्ञांच्या मते, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही उच्च रक्तदाबाच्या त्रासावर मात करण्याचा विचार करीत असाल तर दररोज मनुकाचा रस पिऊ शकता. तुम्ही दररोज सॅलडमध्ये लाल मनुक्याचा समावेश करू शकता.

हाडांसाठी तितकेच फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, लाल मनुक्यामध्ये कॅल्शियमही पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे लाल मनुक्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. याव्यतिरिक्त ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील कमी होतो. म्हणूच दररोज लाल मनुक्याचे सेवन करणे हा चांगले आरोग्य राखण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनुक्याच्या ज्यूसही वापरू शकता. लाल मनुका कुठल्याही भागात अगदी सहज उपलब्ध होतो. मग तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग. त्यामुळे कुणीही लाल मनुका उपलब्ध करून आपल्या उच्च रक्तदाबाच्या समस्येतून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. तुम्हीही लाल मनुका सेवनाचा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. फक्त कुठलाही उपाय करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. (Want to control high blood pressure, then drink raisin juice daily)

इतर बातम्या

सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा रोखण्यासाठी अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव

MPSC परीक्षेसंदर्भात समिती गठीत केली जाणार, स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.