झोपाल तर चांगलं जगाल… महिलांनो पुरूषांपेक्षा तुम्हाला 20 मिनिटे अधिक झोप गरजेची, असे का ते जाणून घ्या..

सकाळी तुमच्या जोडीदाराआधी उठणे तुम्हाला आवडत नाही का ? तुम्हालाच आधी का उठावं लागतं, असा प्रश्न तुम्हाला पडतो का? तर मग ही बातमी जरूर वाचा.

झोपाल तर चांगलं जगाल... महिलांनो पुरूषांपेक्षा तुम्हाला  20 मिनिटे अधिक झोप गरजेची, असे का ते जाणून घ्या..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:50 AM

नवी दिल्ली – जिथे लहान मुलांना सकाळी उठावसं वाटत नाही, तेच ज्येष्ठ अथवा वृद्ध व्यक्तींना झोप (sleep) न येण्याची समस्या सतावते. कुठे जरा खुट्ट जरी झालं तरी ते जागे होतात. झोप लागणे किंवा न लागणे हे (sleeping problem) आपल्या हातात नसते. पण काही सवयी सुधारल्या तर झोपही नियमित होऊ शकते (Healthy sleep time). पण झोप न येण्यामागे वय हेही एक मोठे कारण आहे. चला तर मग झोपेशी संबंधित काही रंजक माहिती जाणून घेऊया.

नॅशनल स्लीप फाऊंडेशननुसार –

– नवजात बाळाची झोप 12 ते 16 तास असते.

हे सुद्धा वाचा

– 1 ते 2 वर्षांचे मूल 11 ते 14 तास झोपते.

– 3 ते 5 वर्षांच्या मुलास 10 ते 13 तासांची झोप आवश्यक असते.

– 6 ते 9 वर्षांचे मूल 9 ते 12 तास झोपू शकते.

– किशोरवयीन 8 ते 10 तास झोपतात, जे नित्यक्रमानुसार कमी-अधिक असू शकतात.

– 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोक 7 तासांची झोप घेतात. तर, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी कमीत कमी 8 तास झोप घेतली पाहिजे.

महिलांनी घेतली पाहिजे जास्त झोप

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार, किशोरवयीन मुलींना 8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे. त्याच वेळी, 24 ते 64 वर्षे वयोगटातील महिलांनी दिवसभरात सात तासांची झोप घेणे आवश्यक आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते. प्रत्येक स्त्रीने पुरुषांपेक्षा 20 मिनिटे जास्त झोपले पाहिजे.

महिलांना कमी झोप येण्याचे कारण

– पीरियड्समध्ये मूड स्विंग झाल्यामुळे झोप येत नाही.

– मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या स्थितीत स्त्रिया पूर्णपणे झोपू शकत नाहीत.

– काही महिलांना डिप्रेशनमुळे झोप येत नाही

– गर्भधारणेदरम्यान, शरीरातील बदल आणि हार्मोनल बदलांमुळे झोपेचा त्रास सुरू होतो.

चांगली झोप हवी असेल तर अशी घ्या काळजी

रूटीन कायम ठेवा

अभ्यासात असे आढळून आले आहे की जर तुम्ही रोज रात्री एकाच वेळी झोपायला गेलात तर तुम्हाला चांगली झोप येईल. यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या संतुलित करावी लागेल. तुमची कामे वेळेवर करा, जेणेकरून तुम्ही वेळेवर झोपू शकाल आणि झोप पूर्ण झाल्यामुळे आरोग्य चांगले राहते.

टॅब आणि मोबाईलपासून दूर रहा

रात्री झोपण्यापूर्वी काही वेळापर्यंत गॅजेट्सपासून दूर रहावे. ज्यामुळे तुम्हाला सहज झोप लागेल. खरंतर वारंवार फोन आणि टॅब, कवास्तविक, फोन आणि टॅबकडे वारंवार पाहिल्याने तुमची झोप उडते. आणि तुम्ही ते बाजूला ठेवून झोपलात तरी मेलाटोनिन नावाचे हार्मोन बाहेर पडायला वेळ लागतो.

कॅफेन आणि छोटी झोप घेणे टाळा

रात्री पूर्ण व शांत झोप लागावी यासाठी दिवसा डुलकी घेण्यापासून स्वतःला रोखा. अन्यथा तुम्हाला रात्री चांगली झोप लागणार नाही. तसेच कॅफेनचे सेवनही टाळा, कारण ते आपल्या शरीरात तासनतास राहते. तुम्ही चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर झोपण्याच्या काही वेळापूर्वी त्यांचे सेवन टाळा.

पुस्तकं वाचा

पुस्तकं वाचूनही गाढ झोप लागते. अनेक वेळा असं होतं की आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, पण तसं होत नाही. अशा परिस्थितीत ज्यांना काहीतरी नवीन जाणून घ्यायचे आहे ते लोक नेहमी पुस्तके वाचतात, ही एक प्रकारची थेरपी आहे. पुढच्या वेळी झोप येत नसेल तर पुस्तक वाचायला विसरू नका.

मेडिटेशन आहे गरजेचे

सकाळ आणि संध्याकाळच्या योगासनांमुळे शरीराला शांती मिळते. यासोबतच तुमचे वागणे बदलते, जे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. तुम्हालाही तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि पूर्ण झोप घ्यायची असेल, तर मेडिटेशन जरूर करा.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.