AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये होणार सत्तापालट! पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्य दलात फिस्कटलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती होती. मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशातील तणाव निवळला. तसेच सीजफायरची घोषणा करण्यात आली. मात्र या घोषणेनंतर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाज शरीफ आणि सैन्य दल यांच्या फिस्कटल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानमध्ये होणार सत्तापालट! पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्य दलात फिस्कटलं?
पाकिस्तान सैन्य आणि शाहबाज शरीफ
| Updated on: May 10, 2025 | 10:54 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर निवळली. पण काही तासात सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचं सांगितलं. पण भारतीय सैन्य दलाने सीमेवर कोणतीही फायरिंग झाली नसल्याचं सांगितलं आहे. तसेच श्रीनगरमध्ये स्फोट किंवा ब्लॅकआऊट नसल्याचं सांगितलं आहे.त्यामुळे जर खरंच ड्रोन दिसले तर मग पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधाना शाहबाज शरीफ यांच्यात फिस्कटलं तर नाही ना.. कारण अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर शाहबाज सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे. पण त्यानंतर अशा काही हालचाली झाल्याने पाकिस्तानी सैन्याने बंड केलं की काय अशीही चर्चा रंगली आहे. यामुळे पाकिस्तानात सत्तापालट होण्याची शक्यता वाढली आहे.

नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ यांच्यात काय झालं?

पाकिस्तानमध्ये आजपासून 25 वर्षापूर्वी म्हणजेच 12 ऑक्टोबर 1999 साली सत्तापालट झाला होता. फेब्रुवारी 1997 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या. तेव्हा नवाज शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. त्यामुळे नवाज शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. या काळातच पाकिस्तानने अणुचाचण्या केल्या होत्या. त्या यशस्वी झाल्या. पण लष्करप्रमुख जनरल जहांगीर करामत यांच्याशी वाद झाल्याने नवाज शरीफ यांनी सूत्र परवेझ मुशर्रफ याच्या हाती दिली. पण मुशर्फ यांनी लष्करप्रमुख होताच रंग बदलला. तसेच पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवताच कारगिलवर हल्ला केला.

उमर अब्दुल्ला यांनी विचारले- युद्धबंदीचे काय झाले?

जम्मूच्या पल्लनवाला सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, “युद्धविरामाचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले!!!” ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, “ही युद्धबंदी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी हवाई संरक्षण तुकड्यांनी गोळीबार सुरू केला आहे.” पण भारतीय सैन्य दलाने असा कोणत्याच हल्ला झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.