AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळा आवळून हत्या, मग पोट फाडून बाळ काढलं, अमानवी-अकल्पनीय गुन्ह्यातील आरोपी महिलेला मृत्युदंड

या महिलेचा गुन्हा इतका अमानुष होता की मानवाधिकारांचं समर्थन करणाऱ्या अमेरिकेलाही मृत्यू दंड देणं भाग पडलं.

गळा आवळून हत्या, मग पोट फाडून बाळ काढलं, अमानवी-अकल्पनीय गुन्ह्यातील आरोपी महिलेला मृत्युदंड
| Updated on: Jan 13, 2021 | 4:07 PM
Share

वॉशिंग्टन : अमेकरिकेत सात दशकांमध्ये पहिल्यांदा कुठल्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा (America Executed First Woman In Seven Decades) सुनावण्यात आली आहे. या महिलेचा गुन्हा इतका अमानुष होता की मानवाधिकारांचं समर्थन करणाऱ्या अमेरिकेलाही मृत्यू दंड देणं भाग पडलं. बुधवारी लिसा मोंटगोमरीला (Lisa Montgomery) विषारी इंजेक्शन (Lethal Injection) देऊन तिला मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली (America Executed First Woman In Seven Decades).

आरोपी महिलांनी एका गर्भवती डॉग ब्रिडरची हत्या करुन तिचं पोट कापून तिच्या बाळाला बाहेर काढलं होतं. त्यानंतर ती घटनास्थळावरुन फरार झाली होती. अमेरिकेच्या फेडरल अधिकाऱ्यांद्वारे कुठल्या महिलेला सात दशकांमध्ये पहिल्यांदा मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय लिसा मोंटगोमरीला स्थानिक वेळेनुसार पहाटे 1:31 वाजता इंडियानाच्या टेरे हाऊते तुरुंगात मृत घोषित करण्यात आले. फेडरल जूरीद्वारे एकमताने हा निर्णय दिला आणि मिसौरीच्या पश्चिमी जिल्ह्याच्या अमेरिका जिल्हा न्यायालयाद्वारे लागू करण्यात आलेल्या निर्णयानंतर लिसाला मृत्यूदंड देण्यात आला.

माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सरकारने मृत्यूची शिक्षा सुनावण्याच्या अर्जाला मंजूरी दिली. ज्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही तासांनंतर लिसाच्या मृत्यूदंडाला मान्यता दिली. आरोपी महिलेल्या मानसिक परिस्थितीला पाहता तिला शिक्षा मिळणार की नाही याबाबत संशय होता.

आरोपीच्या वकिलाकडून निर्णयावर निराशा व्यक्त

सुनावणीदरम्यान, आरोपी मोंटगोमरीच्या वकिलाने तिच्या गुन्ह्याच्या गंभीरतेला नकारलं नाही. पण, तिची वकील कॅली हेनरी यांनी एक वक्तव्य केलं. यामध्ये तिने न्यायालयाच्या आदेशाला विरोध करत तो बेकायदेशील आणि बेलगाम सत्तेची आवश्यकता नसल्याचं म्हटलं (America Executed First Woman In Seven Decades).

लिसाने नेमकं काय केलं?

अमेरिकेत 1953 मध्ये एका महिलेला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली होतीय ती अखेरची होती. त्यामुळे या न्यायालयाच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. मोंटगोमरीने 2004 मध्ये एका 23 वर्षीय गर्भवती महिला जो स्टिनेटची दोरीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने स्टिनेटचं पोट कापलं आणि तिच्या आजन्म बाळाला बाहेर काढलं आणि त्या बाळाला घेवून ती पसार झाली. पण, पोलिसांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेता तात्काळ लिसाला अटक केली.

America Executed First Woman In Seven Decades

संबंधित बातम्या :

Special Story : अफगाणिस्तान, सीरियात जे पेरलं तेच अमेरिकेत उगवलं? फोडा आणि राज्य करा

US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी

संडे स्पेशल- दुसऱ्या देशात घुसून ‘मोसाद’ काम कशी फत्ते करते?

नायजेरियात पुन्हा नरसंहार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पादरीचे अपहरण, 11 जणांची हत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.