धक्कादायक, अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) संयुक्त राष्ट्राच्या (United Nation) पथकावरच जीवघेणा हल्ला झालाय.

धक्कादायक, अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू


Attack on UN Convoy in Afghanistan काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) संयुक्त राष्ट्राच्या (United Nation) पथकावरच जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्यात 5 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालाय. हा हल्ला काबुल-जलालाबाद रोडवर (Kabul-Jalalabad Road) झाला. संबंधित सुरक्षा रक्षक संयुक्त राष्ट्राच्या पथकाचं संरक्षण करत असताना त्यांचा मृत्यू झाला. हे जवान डायरेक्टोरेट ऑफ प्रोटेक्शन सर्विससाठी (डीपीएस) काम करत होते. याबाबत अफगाणिस्तानमधील स्थानिक माध्यम संकेतस्थळांनी वृत्त दिलंय (Attack on United Nation team in Afghanistan).

या घटनेला अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्यता मोहिमेने (UNAMA) देखील याबाबत दुजोरा दिलाय. UNAMA ने ट्विट करत म्हटलं, “राजधानी काबुलमधील सुरोबी जिल्ह्यात (Surobi District) झालेल्या या हल्ल्यात अफगाण डायरेक्टोरेट ऑफ प्रोटेक्शन सर्विसच्या 5 जवानांचा मृत्यू झालाय. यामुळे अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र संघटनेला धक्का बसलाय. जवानांनी संयुक्त राष्ट्र पथकाचा बचाव केल्यानं यातील कुणीही जखमी झालेलं नाही. तसेच या पथकांच्या वाहनांचंही कोणतंही नुकसान होणार नाही, मात्र डीपीएसच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय.

सकाळी 10 वाजता अचानक हल्ला

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिवांचे उप-विशेष प्रतिनिधी रामिज अलकबारोव यांनी सोशल मीडियावर या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाविषयी संवेदना व्यक्त केली (Attack on UN Convoy in Afghanistan). त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “अफगाणिस्तानमधील हिंसेचा अंत व्हायला हवा.’ संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सुरोबी जिल्ह्यातील तांगी अब्रेशुम परिसरात गुरुवारी (12 मार्च) सकाळी 10 वाजता घडली.

हेरात प्रांतात बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे या हल्ल्याआधी एक दिवस अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतात (Herat Province) एक कार स्फोट झाला होता. या हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 47 जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक रुग्णालयाचे प्रवक्ते रफीक शेराजी म्हणाले, “शुक्रवारी (12 मार्च) रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात 14 घरांचंही मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात जखमींमधील काहींची तब्येत गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचाही धोका आहे.

मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश

हेरात प्रांतात झालेल्या हल्ल्याबाबत अफगाणिस्तानचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन (Tariq Arian) म्हणाले, “मृतांमध्ये एक आणि जखमींमध्ये 11 अफगाणिस्तानच्या जवानांचा समावेश आहे. इतरांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश आहे. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.” आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांमध्ये झालेल्या घटनांमध्ये कट्टरवादी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचंही (Islamic State) नाव आलेलं आहे. त्यामुळे या हल्ल्यातही याच संघटनेच्या नावाची चर्चा आहे.

हेही वाचा :

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

Shahtoot Dam : भारत-अफगाणिस्तान मैत्रीने पाकिस्तानची नाचक्की, पाण्यासाठीही तरसणार?

भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, अलकायदा आणि तालिबानकडून कुरापती का?

व्हिडीओ पाहा :

Attack on United Nation team in Afghanistan

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI