अबुधाबीतील BAPS मंदिराला भेट, सुलतान अहमद बिन सुलायम भावविभोर
Sultan Ahmed bin Sulayem : संयुक्त अरब अमिरातचे मुख्य व्यावसायिक सुलतान अहमद बिन सुलायम यांनी अबुधाबीतील BAPS मंदिराला भेट दिली. त्यावेळी या मंदिराची स्थापत्यकला, स्वच्छता आणि भव्यतेचे त्यांनी खुल्यादिलाने कौतुक केले.

संयुक्त अरब अमिरातचे (UAE) मुख्य व्यावसायिक, डीपी वर्ल्डचे ग्रुप संचालक आणि सीईओ, पोर्ट्स,फ्री झोन कॉर्पोरेशनचे संचालक सुलतान अहमद बिन सुलायम यांनी अबुधाबीतील BAPS मंदिराला भेट दिली. त्यावेळी त्यांचा मुलगा गनीम बिन सुलायम हे पण उपस्थित होते. त्यावेळी या मंदिराची स्थापत्यकला, स्वच्छता आणि भव्यतेचे त्यांनी खुल्यादिलाने कौतुक केले. ते या मंदिरात दोन तास थांबले. येथे एक अध्यात्मिक ऊर्जा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वामी ब्रह्मविहारदासजी यांनी सुलतान अहमद बिन सुलायम यांचे स्वागत करत भेट दिल्याबद्दल आभार मानले. कोविड-19 च्या कठीण परिस्थितीत मंदिरासाठी दगडांची वाहतूक सुलभ करणे असो वा मंदिराच्या शाश्वत आणि प्रगतीशील उपक्रमांना पाठिंबा देण्याचे काम बिन सुलायम यांनी दिल्याची आठवण स्वामींनी काढली. सुलायम यांची उपस्थिती कायम एक शक्ती आणि प्रेरणा देणारी असल्याचे ते म्हणाले.

ही तर अद्भूत निर्मिती
या अद्भूत निर्मितीचा मी एक छोटासा भाग आहे, हाच माझा सन्मान आहे. माझ्या यापूर्वीच्या भेटीपेक्षा हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. हे ठिकाण प्रेरणादायी आहे. महाराजांना हे स्थान योग्य असल्याची अगोदरच जाणीव होती.
“स्थानाची निवड प्रेरणादायी होती. महाराजांना माहित होते की हे योग्य स्थान असेल. मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेची आठवण करून देताना ते म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा आलो. मी पहिल्यांदा आलो, तेव्हा एक मचान, जमीन आणि वाळूचे ढीग होते. तेव्हा थ्रीडीने येथील मंदिर कसे असेल याची कल्पना देण्यात आली होती. पण त्या कल्पनेपेक्षा ही वास्तू अद्भूत आणि अवर्णनीय आहे. हा स्थापत्यकलेचा अद्भूत नमूना आहे” अशी प्रतिक्रिया सुलायम यांनी दिली.

मन,हृदय आणि आत्मा तृप्त झाला
मंदिर ही केवळ एक वास्तू नाही तर आत्म्याचे स्थान आहे. या ठिकाणी मन, हदय आणि आत्मा समाधानी होतो. येथे येणाऱ्यांना हा अनुभव येतोच. हे मंदिर उभारणीत काहींनी स्वतःला समर्पित केलं. त्यांचे कष्ट शब्दात मांडणं अशक्य आहे. येथे प्रत्येक वेळी भेट देताना वेगळा अनुभव येतो. मी येथे येण्यास पुन्हा पुन्हा उत्सुक आहे, असे सुलायम म्हणाले. बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्धघाटन 14 फेब्रुवारी 2024 रोजी झाले होते. संयुक्त अरब अमिरातमधील हे पहिला पारंपारिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर 27 एकरवर पसरलेले आहे. राजस्थानमधील वाळूमय दगडाचा त्यासाठी वापर झाला आहे.
