चीनच्या ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागला सुरूंग, ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका
USA China Trade: अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जगातील बहुतांशी देशांवर कर लादला होता. यात भारत, चीन, ब्राझील अशा देशांचा समावेश आहे. या देशांच्या मालावर आयात कर लादून अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता. मात्र आता चीनने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जगातील बहुतांशी देशांवर कर लादला होता. यात भारत, चीन, ब्राझील अशा देशांचा समावेश आहे. या देशांच्या मालावर आयात कर लादून अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता. मात्र आता चीनने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. चीनने अमेरिकन सोयाबीन खरेदी करणे पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे आता अमेरिकेसमोर सोयाबीन कुठे विकायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चीनचा अनेरिकेला दणका
अमेरिकेने लादलेल्या कराला उत्तर देताना चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. गेल्या 7 वर्षांत पहिल्यांदाच चीनने अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला आहे. सप्टेंबरमध्ये चीनने अमेरिकेतून होणारी सोयाबीनची आयात थांबवली आहे. चीनने याबाबत डेटा शेअर केला आहे. यात सप्टेंबर 2025 मधील आयात ही 0 झाल्याचे समोर आले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार चीनने अमेरिकन मालावरही कर लादला आहे, त्यामुळेच सोयाबीनची आयात थांबली आहे. यामुळे आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.
चीनने या देशांमधून सोयाबीनची आयात वाढवली
चीनच्या सोयाबीन खरेदीबाबत कॅपिटल जिंगडू फ्युचर्सचे तज्ज्ञ वान चेंगजी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘चीन हा सोयाबीन आयात करणार जगातील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकन सोयाबीनच्या आयातीतील घट टॅरिफमुळे झाली आहे.’ समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चीनने मागील महन्यात महिन्यात ब्राझीलमधून होणारी आयात 29.9% वाढवली आहे. तसेच चीनने अर्जेंटिनाकडूनही चीनने सोयाबीनची आयात वाढवली आहे.
अमेरिकन शेतकरी संकटात
सप्टेंबरमध्ये चीनने 12.87 दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन आयात केले, मात्र यात अमेरिकन सोयाबीनचा समावेश नाही. चीनसह इतर देशही आता अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्याऐवजी ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून सोयाबीनची खरेदी करत आहेत. त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. आगामी काळात व्यापार करार न झाल्यास अनेरिकन शेतकरी आणखी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चीनने अमेरिकन सोयाबीन खरेदी बंद केल्याचा फटका चीनलाही बसण्याची शक्यता आहे. अॅग्राडार कन्सल्टिंगचे संस्थापक जॉनी जियांग यांनी म्हटले की, जर चीन आणि अमेरिकेत व्यापार करार झाला नाही, तर पुढील वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान चीनला सोयाबीनच्या कमतरतेचा सामना करावा लागू शततो, त्यामुळे दोन्ही देशांमधील करार होणे गरजेचे आहे.
