Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वाक्याने खळबळ, चांदीचा भाव धडाम्, नेमंक काय घडलं?
सध्या सोने आणि चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापारावर केलेल्या एका भाष्यानंतर आता चांदीचा भाव चांगलाच घसरला आहे. सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

Gold And Silver Rate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला जगात फार महत्त्व आहे. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारावर पडतो. ट्रम्प यांच्या धोरणामुळे सध्या जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. सोबतच चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळ सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका नव्या भूमिकेमुळे सोने आणि चांदीचा भाव धडाम् झाला आहे.
बाजारात नेमकं काय घडलं आहे?
आज (20 ऑक्टोबर) सकाळी सोने आणि चांदीच्या भावात ठिकठाक तेजी पाहायला मिळत होती. मात्र दुपारी बारा वाजेनंतर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत चांगलीच घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा भाव सार्वकालीक उच्चांकावर पोहोचला होता. हा भाव आता सार्वकालीक उच्चांकावरून थेट 17 हजार रुपयांनी खाली आला आहे. शुक्रवारच्या बंद बाजार भावाच्या तुलनेत चांदीचा भाव आता 3500 रुपयांनी घसरला आहे. जागतिक पातळीवर विचार करायचा झाल्यास चांदीचा भाव साधारण 7 टक्क्यांनी घसरून 54 डॉलर्स प्रतिऔंस या आपल्या सार्वकालीक उच्चांकावरून थेट 50 डॉलर्स प्रतिऔंसवर घसरला आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? बाजारावर परिणाम कसा झाला?
सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात सोने-चांदी हा गुंतवणुकीचा सर्वाधिक सुरक्षित असा पर्याय मानला जात आहे. त्यामुळे जगभरात सोन, चांदीच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. चांदीचा उपयोग दागिन्यांसाठी केला जातो. सोबतच सध्या उद्योगांसाठी चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. चांदीचे उत्पादन हे मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेही चांदीचा भाव वाढला आहे. शुक्रवारी मात्र काही वेगळ्या घडामोडी घडल्या. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापरविषयक तणाव काहीसा निवळला. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चांदीमध्ये होत असलेली गुंतवणूक घटली. अमेरिकेकडून चीनवर लादण्यात आलेला 100 टक्क टॅरिफ हा टिकाऊ नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. चीनने आम्हाला मजबूर केल्यामुळेच आम्हाला हा टॅरिफ लावावा लागला, असेही ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक तणाव कमी झाला. त्याचाच परिणाम सोने आणि चांदीचा भाव घसरला.
चांदीच्या भावात नेमका काय बदल झाला?
देशातील वायदा बाजारत चांदीच्या भावात घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा बाव मल्टी कमोडिटी एक्स्जेंचवर 1,70,415 रुपये या आपल्या सार्वकालीक उच्चांकावर पोहोचला होता. तेव्हापासून सध्या सोन्याच्या भावात 17,284 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी म्हणजेच दिवळीच्या दिवशी चांदीचा भाव 1,53,131 रुपयांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत चांदीचा भाव हा 10 टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवारच्या बंद बाजार भावाच्या तुलनेत सोमवारी मात्र सोन्याचा भाव 3,271 रुपयांनी वाढला आहे. सोमवारी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत सोन्याचा भाव हा 1,55,497 रुपयांपर्यंत होता.
