Corona in World : ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या 4 लाखाच्या वर, तिसऱ्या लाटेचाही धोका

ब्राझिलमध्यो कोरोना विषाणूचं (Coronavirus in Brazil) संकट लाखो लोकांचे जीव घेत आहे. गुरुवारी ब्राझिलमधील (Brazil) कोरोना बळींची संख्या 4 लाखांच्या वर गेलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:20 PM, 30 Apr 2021
Corona in World : ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या 4 लाखाच्या वर, तिसऱ्या लाटेचाही धोका

नवी दिल्ली : ब्राझिलमध्यो कोरोना विषाणूचं (Coronavirus in Brazil) संकट लाखो लोकांचे जीव घेत आहे. गुरुवारी ब्राझिलमधील (Brazil) कोरोना बळींची संख्या 4 लाखांच्या वर गेलीय. कोरोनाच्या मृत्यूंमध्ये अमेरिकेनंतर (America) ब्राझिल दुसऱ्या क्रमांवर आलाय. मागील एका महिन्यात ब्राझिलमध्ये 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावलाय. थंडीच्या दिवसांमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती अधिक चिघळेल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय (Brazil Corona Updates 4 lakh people died due to Covid 19 infection risk of third wave).

एप्रिल महिना ब्राझिलसाठी खूपच धोकादायक ठरलाय. या महिन्यात ब्राझिलमधील रुग्णालयांमध्ये हजारो लोकांचा कोरोना संसर्गानंतर मृत्यू झाला. एप्रिलच्या सुरुवातीला ब्राझिलच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, “देशात 4 हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झालाय. दुसरीकडे सातच दिवसांमध्ये सरासरी 3100 लोकांचा मृत्यू झाला. मागील 2 आठवड्यांमध्ये मृतांच्या संख्येत थोडी घट झाली होती. या दोन्ही आठवड्यांमध्ये दर दिवशी सरासरी 2400 लोकांचा मृत्यू झाला. गुरुवारी (29 एप्रिल) 3,001 लोकांच्या मृत्यूसह ब्राझिलमधील एकूण मृतांची संख्या 4 लाख 1 हजार 186 झाली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका

स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नुकत्याच काही काळापासून नव्या कोरोना रुग्णांच्या आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत काहीशी घट झालीय. त्यामुळे ब्राझिलच्या आरोग्य यंत्रणांवरील ताण काहीसा कमी झालाय. मात्र, कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. अशाप्रकारची लाट युरोपमधील काही देशांमध्ये पाहायला मिळाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की उद्योग आणि व्यापारात सूट दिली जाते त्यामुळे पुढील लाट येत असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा मंद वेग हेही यामागील एक कारण आहे.

लॉकडाऊनबाबत बोल्सोनारो यांची कठोर भूमिका

आतापर्यंत केवळ 6 टक्के ब्राझिलच्या नागरिकांना लसीकरण मिळालंय. राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी आपण कोरोना लस घेणारे शेवटचे व्यक्ती असू असं सातत्याने म्हटलंय. बोल्सोनारो यांनी कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन गेलेल्या राज्यांच्या गव्हर्नर आणि शहरांच्या महापौरांवर जोरदार टीका केलीय. ब्राझिलमधील मृतांची संख्या 4 लाखांच्या वर गेल्यावर बोल्सोनारो म्हणाले, “मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव गेले आहेत. मला प्रत्येक मृत्यूबाबत दुःख आहे. मी देवाकडे कोरोनाची तिसरी लाट देशात येऊ नये म्हणून प्रार्थना करतो. मात्र, लॉकडाऊनचं धोरण कायम राहिलं तर देशात भयंकर गरीबी तयार होईल.”

हेही वाचा :

ब्राझिलमध्ये दररोज सरासरी 1000 लोकांचा मृत्यू, उपाययोजना न झाल्यास जगावर ‘कोरोना स्फोटाचं’ संकट

आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना लस आधी द्या, वेश्या व्यवसायातील महिलांची मागणी

World Corona Bulletin : ब्राझिलमध्ये मृतदेहांसाठी जमिनीचा तुटवडा, पाकिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती, जगाची अवस्था काय?

व्हिडीओ पाहा :

Brazil Corona Updates 4 lakh people died due to Covid 19 infection risk of third wave