Iran Protest : 100 बंदुका, 7 एजंट..इराणमध्ये हिंसक विरोध प्रदर्शनाच्या आडून काय घडतय? खामेनेई विरोधात मोठा कट उघड
Iran Protest : इराणच्या रस्त्यावर हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. इराणमधली परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे. पोलादी पकड असलेल्या अली खामेनेई यांचा गेम ओव्हर करण्यासाठी पडद्याआडून मोठी चाल खेळली आहे. जाणून घ्या या खेळामागचे सूत्रधार.

इराणमध्ये मागच्या पाच दिवसांपासून हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. यामागे पाश्चिमात्य देशांचं कारस्थान असल्याचा दावा अली खामेनेई सरकारने केला आहे. खामेनेईच्या आर्मीशी संबंधित गुप्तचर यंत्रणेने या संबंधीचे काही पुरावे मीडियासमोर ठेवले आहेत. यात बॉर्डरच्या दुसऱ्या बाजूकडून आलेली शस्त्र आणि परदेशी एजंट्स या कटात सहभागी असल्याचा इराणचा दावा आहे. पाश्चिमात्यदेशांनी हे आंदोलन पुरस्कृत केलं आहे. त्या आंदोलनाच्या आडून इस्लामिक शासनाला सत्तेतून हटवायचं आहे. तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, खामेनेई आर्मीने विरोध प्रदर्शनाला हवा देणाऱ्या 7 लोकांना पकडलं आहे. हे सात जण अमेरिका आणि इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावा आहे. काहीही झालं तरी हे प्रदर्शन यशस्वी होऊ देणार नाही असा इराणचा दावा आहे.
इराणच्या गुप्तचर संस्थेला 100 अशा बंदुका मिळाल्या आहेत, ज्यांचा आंदोलकांकडून वापर सुरु होता. या सर्व बंदुका सीमेपलीकडून आल्या आहेत असं इराणच्या गुप्तचर संस्थेचा दावा आहे. आम्ही त्या लोकांचा शोध घेतोय, जे तस्करीच्या माध्यमातून ही शस्त्र इराणमध्ये आणत आहेत. शस्त्र पाठवून इराणमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य देशांकडून ही सर्व शस्त्रास्त्र पाठवली जातायत असा इराणच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा आहे.
या सर्वांची कसून चौकशी सुरु आहे
इराणमधून 7 एजंट्सना अटक करण्यात आली आहे. मेहर न्यूज एजन्सीनुसार, अटक केलेल्यांपैकी 5 जण अमेरिकेतली राजशाहीवादी गटांच्या संपर्कात होते. 2 युरोपमधील गटाच्या संपर्कात होते. या सर्वांची कसून चौकशी सुरु आहे. इराण सरकार राजेशाहीशी संबंधित नेटवर्क मोडून काढण्याच्या कामाला लागलं आहे. खामेनेई यांचे सल्लागार जनरल हुसैन अशतरी यांच्यानुसार इराण विरोधात मोठं कारस्थान सुरु आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. सर्वांनी राष्ट्रीय एकता कायम ठेवून सामाजिक विभाजन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही वेळेची मागणी आहे असं अशतरी म्हणाले.
व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम या विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली
इराणमध्ये जल संकट आणि सतत वाढत जाणारी महागाई यामुळे व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम या विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली. हळू-हळू या विरोध प्रदर्शनात विद्यार्थी आणि महिला सहभागी झाल्या. इराण सरकारचं म्हणणं आहे की, सुरुवातीला मुद्यांवर आधारित प्रदर्शन होतं. पण आता हे आंदोलन बनलं आहे. इराणला भिती वाटतेय की हे आंदोलन त्यांचं सरकार पाडेल. 1953 साली CIA ने इराणमध्ये सत्तापालट घडवून आणला होता.
