AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात मोठी चोरी, 8 अब्जाचे हिरे क्षणाधार्त गायब झाले ते आजपर्यंत सापडले नाहीत…

तुम्ही अनेक चोरीबद्दल ऐकले असेल. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? जगातील सर्वात मोठी चोरी कोणती होती आणि ती कधी झाली ? चला तर आज पाहूयात शतकातील सर्वात मोठ्या चोरीबद्दल..

जगातील सर्वात मोठी चोरी, 8 अब्जाचे हिरे क्षणाधार्त गायब झाले ते आजपर्यंत सापडले नाहीत...
world biggest diamond heist in belgium
| Updated on: Aug 27, 2025 | 11:02 AM
Share

हिरा एक अशी मौल्यवान वस्तू आहे की त्याचे नाव घेताच भल्याभल्या लोकांचे डोळे विस्फारतात आणि नियत फिरते. तुम्ही अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. परंतू जगातील सर्वात मोठी चोरी कोणती होती.? जर माहिती नसेल तर चला वाचूयात जगातील सर्वात मोठी चोरीची घटना कशी आणि कधी घडली होती ?

ही घटना बेल्जियम शहरातील एंटवर्प ( Antwerp World Diamond Centre’s vault ) येथे घटली होती. आणि साल होते 2003 फेब्रुवारीचा महिना होता. एंटवर्प ज्यास हिऱ्याची राजधानी म्हटले जाते. येथील सर्वात सुरक्षित तिजोरी एंटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटर वॉल्टना टार्गेट करण्यात आले होते. ही चोरी इतक्या चलाखीने केली होती की यास शतकातील सर्वात मोठी चोरी म्हटले जाते. या चोरीचा मास्टरमाईंड होता ( Leonardo Notarbartolo ) ‘लियोनार्डो नोतरबार्तोला ‘.

दोन वर्षांपर्यंत सुरु होती प्लानिंग

लियोनार्डो नोतरबार्तोलो हा कोणी साधारण चोर नव्हता, त्याने या चोरीची योजना दोन वर्षे केली होती. त्याने दोन दिवसात जगातील सर्वात मोठ्या चोरीचा कट प्रत्यक्षात आणला.त्याने त्यांची टीम मोठ्या सावधानतेने निवडली. टीमला नाव दिले ‘स्कूल ऑफ ट्यूरिन’. या टीमचे प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या कामात माहिर होता. कोणी टाळा तोडण्यात उस्ताद होता. तर कोणी हायटेक डीव्हाईस चालवण्यात माहीर होता.15-16 फेब्रुवारी 2003 रोजी रात्री ही चोरी झाली.

कशी झाली चोरी ?

एंटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरची तिजोरीला जगातील सर्वाधिक सुरक्षित तिजोरी मानले जात होते. परंतू नोतरबार्तोलो आणि त्याच्या टीमने सर्व सुरक्षा भेदत हे काम तडीस नेले. त्यांनी सुरक्षा कॅमेऱ्यांनाही चकमा देण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर केला. तिजोरी उघडण्यासाठी डुप्लिकेट चाव्या तयार केल्या. त्यांची चलाखी अशी होती की कोणताही सेंसर त्यांना पकडू शकला नाही.या चोरीत सुमारे 100 दशलक्ष डॉलरचे हिरे, सोने आणि मौल्यवान दागिने चोरले गेले. भारतीय रुपयात ही रक्कम 8,77,28,68,680 रुपये होते.

चोरी झाल्यानंतर तिजोऱ्यांची अवस्था

Antwerp World Diamond Centre’s vault

कोण होता लियोनार्डो नोतरबार्तोलो

लियोनार्डो नोतरबार्तोलो याची कहाणी रंजक आहे. त्याने सहा वर्षांचा असताना चोरी करायला सुरुवात केली होती. त्याने 1958 मध्ये जेव्हा त्याच्या आईने दूध आणायला पाठवले तेव्हा दूधवाल्याच्या झोपेचा फायदा उचलत त्याच्याकडील गल्ल्यातून 5,000 लीरा (सुमारे 8 डॉलर)चोरले.साल 2000 मध्ये त्याने डझनावारी चोऱ्या केल्या, परंतू एंटवर्पच्या चोरीने त्याला जगभरात प्रसिद्ध केले.

आजपर्यंत मिळाला नाही चोरीचा माल

हैराणीचा गोष्ट म्हणजे या चोरीचा मुद्देमाल आजपर्यंत सापडलेला नाही. नोतरबार्तोला याला काही पुराव्यांच्या आधारे 10 वर्षांची शिक्षा झाली. परंतू त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही.त्याने पत्रकारांशी या प्रकरणात बोलण्यासही नकार दिला. तो म्हणायचा की कला सिद्ध करण्यासाठी मी चोरी करत असतो पैशासाठी नाही. ही चोरी आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. नोतरबार्तोलो आणि त्याच्या टीम सुरक्षेचे कडे मोडत कशी चोरी केली ही कहानी चित्रपटापेक्षाही रंजक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.