आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी (Abu Bakr Al Baghdadi Killed) याचा अमेरिकन सैन्याने खात्मा केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Follow us
| Updated on: Oct 27, 2019 | 9:19 PM

न्यूयॉर्क : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी (Abu Bakr Al Baghdadi Killed) याचा अमेरिकन सैन्याने खात्मा केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन सैन्याने सिरीयामध्ये शनिवारी कारवाई करत बगदादीची ठिकाणं उद्ध्वस्त केली.

वायव्य सिरीयात बगदादीच्या असलेल्या ठिकाण्यांवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने सैन्याने शनिवारी हल्ला केला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन आपण मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले, “अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये एक मोठी मोहिम पार पाडत इस्लामिक स्टेटचा (आयएस) प्रमुख अबु बकर अल-बगदादीचा खात्मा केला. त्याच्यासोबत त्याचे 3 मुलं आणि अनेक सहकारी देखील यात मारले गेले.”

बगदादी एका सुरुंगात लपलेला होता. अमेरिकी सैन्याने त्याच्या ठिकाणाची घेरेबंदी केल्यानंतर त्याने आपल्या मुलांसह स्वतःला बॉम्बस्फोट करत उडवलं. तो घाबरट होता आणि तो कुत्र्याप्रमाणे मेला, असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले, ‘मागील रात्री अमेरिकेने जगातील क्रमांक एकच्या दहशतवाद्याला न्यायाच्या कक्षेत आणले. अबु बकर अल-बगदादी मारला गेला आहे. तो जगातील सर्वात हिंसक संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख होता.’ ट्रम्प यांनी आयसीस विरोधातील या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल रशिया, सीरिया आणि तुर्की या देशांचे आभार मानले आहेत.

मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली असून त्यात बगदादी मारला गेल्याचं स्पष्ट झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. मागील 5 वर्षांपासून बगदादी लपून बसल्याची माहिती होती. जुलै 2014 मध्ये बगदादीचं दर्शन घडल्यानंतर 5 वर्ष त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु एप्रिल 2019 मध्ये मोसुलमधील मशिदीत बगदादी बोलतानाचा व्हिडीओ समोर आला. मे 2017 मध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये बगदादी गंभीर जखमी झाला होता, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे पाच महिन्यांच्या कालावधीत त्याची आयसिसवरील पकड सैल झाल्याचंही म्हटलं जात होतं. पंरतु आता अमेरिकन सैन्याच्या कारवाईत त्याचा खात्मा (Abu Bakr Al Baghdadi Killed) केला आहे.

2010 मध्ये बगदादीने आयएसआय (इस्लामिक स्टेट ऑफ इराक) चं नेतृत्व हाती घेतलं होतं. 2013 मध्ये ‘अल कायदा’शी हातमिळवणी करत नवी दहशतवादी संघटना स्थापन केली. याचं नामकरण ‘आयएसआयएल’ किंवा ‘आयएसआयएस’-आयसिस असं करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.