अखेर त्या दुष्ट महिलेपासून… डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, थेट म्हणाले, तिने…
रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर दबाव टाकत आहेत आणि भरमसाठ टॅरिफ लावत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एका महिलेबद्दल अत्यंत धक्कादायक असे विधान केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एका महिला नेत्याबद्दल अत्यंत धक्कादायक असे विधान केले. नॅन्सी पेलोसी या अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि अमेरिकन राजकारणातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. मात्र, त्यांनी नुकताच जाहीर केले की, मी 2026 ची निवडणूक लढणार नाहीये. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसमधून निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले. पेलोसी यांनी तब्बल 40 वर्षे कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोचे प्रतिनिधित्व केले. नॅन्सी पेलोसी यांनी आपली निवृत्ती जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. फक्त आनंदच नाही तर त्यांनी पेलोसी यांच्चावर जोरदार टीका देखील केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, एक दुष्ट महिला आहे आणि ती निवृत्त होत आहे याबद्दल मला खूप जास्त आनंद झाला. गेल्या काही वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि नॅन्सी पेलोसी एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. पेलोसी यांनी त्यांच्या कार्यकाळात ट्रम्प यांच्याविरुद्ध तब्बल दोनदा महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली होती. दोघे एकमेकांचे शत्रु राहिले असून कायमच एकमेकांवर टीका करतात.
नॅन्सी पेलोसी यांनी जरी अमेरिकेच्या राजकारणातून निवृत्त घेतली असली तरीही अमेरिकन राजकारणात एक मजबूत नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहील. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे डेमोक्रॅटिक पक्षात नेतृत्व बदलाची स्पर्धा सुरू होऊ शकते, काही युवा नेत्यांना नॅन्सी पेलोसी यांची पद हवे आहे. यामुळे पुढील काही दिवसात डेमोक्रॅटिक पक्षात मोठे बदल होण्याचे मोठे संकेत आहेत. नॅन्सी पेलोसी यांनी अचानक आपली नेतृत्वी जाहीर केली.
डोनाल्ड ट्रम्प यांना जसेही नॅन्सी पेलोसी यांच्या निवृत्तीबद्दल कळाले, तसे लगेचच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. निवृत्ती जाहीर केल्यावरही त्यांनी थेट एक दुष्ट महिला त्यांना म्हटले. नॅन्सी पेलोसी यांन सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. माझ्या शहराला, सॅन फ्रान्सिस्कोला माझा संदेश आहे, म्हणत त्यांनी व्हिडीओची सुरूवात केली आणि आपली निवृत्ती जाहीर केली, यादरम्यान ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.
