Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता नव्या टॅरिफ मिसाईलचं संकट!
रशियाकडून तेल खरेदी बंद करावी म्हणून अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात येतोय. याबाबतची घोषणा याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. आता याच घोषणेनुसार 25 टक्के टॅरिफ लावण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे भारतावर टॅरिफ लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठी धमकी दिली आहे.

Donald Trump Tariffs : रशियाकडून तेल खरेदी बंद करावी म्हणून अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात येतोय. याबाबतची घोषणा याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. आता याच घोषणेनुसार 25 टक्के टॅरिफ लावण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे भारतावर टॅरिफ लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठी धमकी दिली आहे. त्यांनी जगभरातील देशांना आणखी टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता अनेक देशांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय धमकी दिली?
डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या देशांना धमकी देताना दिसतायत. आता त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफ मिसाईल डागण्याचा इशारा दिला आहे. जो देश अमेरिकेतील टेक कंपन्यांवर डिजिटल सेवा कर (डिजिटल सर्व्हिस टॅक्स) लागू करेल, त्या देशाविरोधात अमेरिका मोठा टॅरिफ लागू करेल, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. काही देश अमेरिकेतील अल्फाबेट, मेटा, अमेझॉन यासारख्या टेक कंपन्यांवर कर लागू करण्याच्या विचारात आहेत, त्यांच्याविरोधात टॅरिफ लावण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या देशांचे एका प्रकारे टेन्शनच वाढले आहे.
अमेरिकेतील कंपन्यांवर केला जातोय अन्याय- ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या टॅरिफ लागू करण्याबाबत सांगितले आहे. आम्ही आमच्या देशातील टेक कंपन्यांवर कोणत्याही पद्धतीने हल्ला केल्यास आम्ही तो सहन करणार नाही. डिजिटल टॅक्स, डिजिटल सर्व्हिस नियम, डिजिटल मार्केट रेग्यूलेशनच्या माध्यमातून अमेरिकेतील कंपन्यांना नुकसान पोहोचवले जात आहे. हे नियमच अमेरिकेतील कंपन्यांशी भेदभाव करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत, असा मोठा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. जगभरातील देश चीनच्या बड्या टेक कंपन्यांना सूट देतात, अमेरिकेच्या कंपन्यांवर मात्र अन्याय केला जातोय. हे स्वीकारार्ह नाही, असेही मत ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केले आहे.
हे सगळं लवकर बंद करा, अन्यथा…
अमेरिकेसोबत भेदभाव केला जात आहे. वेगवेगळ्या देशांनी अमेरिकेतील टेक कंपन्यांना नुकसान पोहोचवण्यासाठीच हे नियम तयार केले आहे. हे सगळं लवकरात लवकर बंद करायला हवं. अन्यथा आम्ही अमेरिकेतील कंपन्यांचे मौल्यवान तंत्रज्ञान आणि चिप्सच्या निर्यातीवर बंदी घालू, असादेखील इशारा ट्रम्प यांनी दिलाय.दरम्यान, ट्रम्प यांनी लादलेल्या ट्रॅरिफमुळे अगोदरपासूनच भारतासारखा देश अडचणीत आला आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी ही नवी भूमिका घेतल्याने भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
