AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धात न उतरताच पाकिस्तान बेहाल, लोकांना जगणेही मुश्कील, समोर भयंकर संकट!

पाकिस्तानात आता मोठे इंधनसंकट निर्माण झालेले आहे. इथे गॅसची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु पुरवठाच कमी असल्याने तेथे गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. नेमकं काय करावं? हे लोकांना समजत नाहीये.

युद्धात न उतरताच पाकिस्तान बेहाल, लोकांना जगणेही मुश्कील, समोर भयंकर संकट!
pakistan gas cylinder crisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 7:57 PM
Share

Pakistan Gas Cylinder Crisis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस जास्तच वाढताना दिसतोय. सध्या अमेरिकेने इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला न करण्याचे ठरवले आहे. दोन्ही देशांत युद्धविरामासाठी चर्चा चालू झाली आहे. परंतु या युद्धाचा मात्र इतर काही देशांवर गंभीर परिणाम होताना दिसतोय. भारतालाही त्याची झळ बसत आहे. भारतात इंधनसंकट निर्माण झाले असून गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाहीये. आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात तर युद्धामुळे हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानात गॅस सिलिंडरची किंमत चक्क गगनाला भिडली आहे.

पाकिस्तानात नेमकं काय घडत आहे?

इराणच्या युद्धात पाकिस्तानी लोक भरडले जात आहेत. तेथे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता सामान्य लोकांचे जगणेच मुश्कील झाल आहे. अगोदर पाकिस्तानात 11.67 किलोचा सिलिंडर अगोदर 3,150 ते 3,968 रुपयांना (पाकिस्तानी) मिळत होता. आता याच सिलिंडरची किंमत थेट 3,900 ते 5,135 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानात गॅस सिलिंडर खरेदी करायचे असेल तर तब्बल 5 हजारपेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहेत.

दरवर्षी लागतो 20 लाख टन गॅस, पण आता…

युद्धामुळे पाकिस्तानातही इंधन संकट निर्माण झाले आहे. युद्धाच्या अगोदर पाकिस्तानला इराणकडून प्रतिदिन 10 हजार ते 12 हजार टन प्रतिदिन गॅस पुरवला जात असे. सध्या मात्र हा पुरवठा बंद झाल्याने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. ईद आणि नौराज उत्सवाच्या पार्श्वभूमीवरच हे संकट आल्याने पाकिस्तानी नागरिक त्रस्त आहेत. पाकिस्तामध्ये दरवर्षी साधारण 20 लाख टन गॅस वापरला जातो. पाकिस्तानला काही जहाजांच्या मदतीने गॅसचा पुरवठा होत आहे. परंतु तरीही पाकिस्तानची गरज पूर्ण होत नाहीये. परंतु आता मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने नेमकं काय करावं? असा प्रश्न पाकिस्तानपुढे उभा राहिला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.