कोण कुणावर भारी? इराण की इस्रायल?; एकाकडे तेल तर दुसऱ्याकडे तंत्रज्ञान; आर्मी किती?
जगातील दोन महत्त्वाचे देश सध्या एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत. इराण आणि इस्रायल दरम्यान मोठं युद्ध सुरू झालं आहे. हे युद्ध घनघोर होईल अशा वळणावर आहे. त्यामुळे जगाला चिंता वाटायला लागली आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशावर जगातील अनेक देश अवलंबून आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. त्यातच दोन्ही देशांकडे आर्मी आणि शस्त्रसाठाही तुल्यबळ असल्याने जगाला टेन्शन आलं आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये आता युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देश एकमेकांच्या मागे हात धुवून लागले आहेत. इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर 200 हून अधिक मिसालईलचा मारा केला. इस्रायलच्या सैन्य तळांवरच मुख्यत्वे हा मारा करण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये एकच हल्लकल्लोळ उडाला आहे. सर्व लोक झोपेत असताना झालेल्या या हल्ल्याने आजची सकाळ इस्रायलसाठी शॉकिंग ठरली आहे. इराणने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. तर तिकडे इस्रायलनेही बदला घेण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. पण ते कधी द्यायचं हे आम्हीच ठरवू, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इस्रायल आणि इराणच्या या वादाने मध्य पूर्वेत महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
