इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांचा मनमोहन सिंग यांच्याबाबत मोठा खुलासा

इंग्लंडचे (ब्रिटन) माजी पंतप्रधान (British PM) डेविड कॅमरन (David Cameron) यांनी आपल्या ‘फॉर द रिकॉर्ड’ या पुस्तकात (For The Record Book) भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांचा मनमोहन सिंग यांच्याबाबत मोठा खुलासा

लंडन: इंग्लंडचे (ब्रिटन) माजी पंतप्रधान (Ex British PM) डेविड कॅमरन (David Cameron) यांनी आपल्या ‘फॉर द रिकॉर्ड’ या पुस्तकात (For The Record Book) भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर (Mumbai Terrorist Attack) तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानवर सैन्य कारवाई (Military Action against Pakistan) करण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा कॅमरन यांनी केला. त्यांनी आपल्या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या अनेक आठवणी नमूद केल्या आहेत.

कॅमरन यांनी आपल्या ‘फॉर द रिकॉर्ड’ या पुस्तकात 2010 ते 2016 मधील अनेक घटनांबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. डेविड कॅमरन म्हणाले, “मुंबईसारखा पुन्हा हल्ला झाला तर नाईलाजाने आम्हाला पाकिस्तानविरुद्ध सैन्य कारवाई करावी लागेल, असं स्पष्ट मत मनमोहन सिंग यांनी नोंदवलं होतं.”

कॅमरन यांनी मनमोहन सिंग यांना ‘संत पुरुष’ संबोधत लिहिले, “पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते. ते एक संत पुरुष आहेत. मात्र, भारतावर संकट आल्यावर ते तेवढेच कठोर भूमिका देखील घ्यायचे. भारतातील एका दौऱ्यात त्यांनी मला म्हटले होते, मुंबईत 2008 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ला झाला, तर भारत पाकिस्तानविरोधात थेट सैन्य कारवाई करेल.”
मोदींच्या गळाभेटीबद्दल कॅमरन यांचा खुलासा
डेविड कॅमरन यांनी मनमोहन सिंग यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी देखील खुलासा केला. कॅमरन यांचे मोदींसोबतही चांगले संबंध होते. मोदींनी वेम्बले स्टेडियमवर झालेल्या सभेत कॅमरन यांची गळाभेट घेतली होती. त्याचाही उल्लेख कॅमरन यांनी आपल्या पुस्तकात केला.

कॅमरन यांनी लिहिलं, “मोदी यांच्या भाषणाआधी मी 60 हजार जनसमुहाला एक दिवस भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान होईल, अशी आशा व्यक्त केली होती. त्याला उपस्थित लोकांनी अद्भूत प्रतिसाद देत होकार दिला होता. त्यानंतर मोदी मंचावर आल्यानंतर आम्ही गळाभेट घेतली. त्यावेळी ब्रिटनने जगाला खुल्या मनाने स्वागताचा संकेत दिला होता.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *