घटस्फोटीत पत्नीने इम्रान खानला फटकारलं, मोदींचं कौतुक

इम्रान खानची घटस्फोटीत पत्नी रेहम खानने (Imran Khan wife Reham Khan) पाकिस्तानला आरसा दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरुन पतीलाच रेहम खानने आरसा दाखवण्याचं काम केलंय.

घटस्फोटीत पत्नीने इम्रान खानला फटकारलं, मोदींचं कौतुक

इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 मधील महत्त्वाच्या तरतुदी हटवल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला कुणीही प्रतिसाद दिला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मंत्र्यांकडून युद्धाची भाषा केली जात आहे. पण इम्रान खानची घटस्फोटीत पत्नी रेहम खानने (Imran Khan wife Reham Khan) पाकिस्तानला आरसा दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरुन पतीलाच रेहम खानने (Imran Khan wife Reham Khan) आरसा दाखवण्याचं काम केलंय.

पाकिस्तानच्या जनतेला मूळ मुद्द्यावरुन विचलित करत असल्याबद्दल रेहम खानने इम्रान खानला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत खडतर परिस्थितीतून जात असतानाही तुम्ही काय करत आहात? असा सवाल रेहम खानने केलाय. रेहम खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जगभरातील नेत्यांना मोदी का आवडतात आणि कोणत्याही देश भारतासोबतचे संबंध का खराब करु इच्छित नाही? कारण, त्यांच्याकडे मजबूत अर्थव्यवस्था आहे. सौदी अरेबिया, ब्रिटन, अमेरिका यासारखे अनेक देश भारतासोबत असून भारतात गुंतवणूक करत आहेत, असंही रेहम खानने म्हटलंय.

मोदी जिथे जातील तिथे त्यांचा सन्मान केला जातो. का इज्जत केली जाते? यूएईने सन्मानित केलं तर तुम्हाला त्रास झाला. का त्रास होतो? तुम्ही भिक मागत फिरता, तुम्ही त्यांच्या पायाची माती आहात. अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती झाली आहे. वित्तीय तूट 6.6 टक्क्यांहून 8.8 टक्क्यांवर आली, असं म्हणत रेहम खानने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरुन इम्रान खानवर सडकून टीका केली.

इम्रान खान आणि पत्रकार असलेल्या रेहम खान यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण काही महिन्यातच 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रेहम खानने इम्रान खानवर सनसनाटी आरोप केले होते. रेहम ही इम्रान खानची दुसरी पत्नी होती.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *