Explainer: नेते पळाले पण सैन्याने राखली लाज, देश सांभाळणारी नेपाळची मिलिटरी किती मोठी? भारताशी आहे खास कनेक्शन
सध्या नेपाळ हा देश चर्चेत आहेत. या देशात Gen Zनी केलेल्या आंदोलनाने जगाचे लक्ष वेधले. या देशातील पंतप्रधानांपासून इतर मंत्री गायब झाले आहेत. आक्रमक झालेल्या जनतेला नेपाळई सैन्याने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता नेपाळची मिलिटरी किती मोठी आहे? त्यांना शस्त्र कोण पुरवतं? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.

सध्या नेपाळमध्ये राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान ओली आणि त्यांच्या सरकराने देशातील सोशल मीडियावर बंदी घातली होती. या बंदीविरोधात लाखो Gen Z रस्त्यावर आले आणि सोशल मीडिया बंदी व भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करु लागले. आंदोलक इतके आक्रमक झाले की पंतप्रधान ओली यांच्यासह त्यांच्या सरकारमधील चार नेत्यांना राजिनामा द्यावा लागला. काही आंदोलकांनी इतर नेत्यांच्या घरावर गोळीबार केला तर काहींची घरे जाळून टाकली. इतक्या भयंकर परिस्थितीनंतर नेपाळी सेनेने राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. सेनेने निषेध मोडून काढण्यासाठी राजधानीच्या रस्त्यांवर गस्त घातली. सैन्याचे अधिकारी लाऊडस्पीकरद्वारे राजकीय पोकळीच्या काळात शांतता राखण्याचे आवाहन करत होते. त्यानंतर नेपाळी मिलिटरीची चर्चा सुरु झाले आहे. ती किती मोठी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
