AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fiji-Australia Pact : मोदींनी ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवण्याआधी तिथून आली गुड न्यूज, फिजी-ऑस्ट्रेलियात झाला भारताच्या फायद्याचा करार

Fiji-Australia Pact : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 11 जुलैपर्यंत सहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा दौरा करणार आहेत. मोदी ऑस्ट्रेलियात दाखल होण्याआधी तिथून एक चांगली बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाने फिजीसोबत करार केला आहे. ही बाब भारताच्या पथ्यावर पडणारी आहे.

Fiji-Australia Pact : मोदींनी ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवण्याआधी तिथून आली गुड न्यूज, फिजी-ऑस्ट्रेलियात झाला भारताच्या फायद्याचा करार
Fiji-Australia Pact
| Updated on: Jul 06, 2026 | 3:39 PM
Share

ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. हे दोन्ही देश प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्वाचे देश आहेत. या कराराला ओशन ऑफ पीस अलायंस नाव देण्यात आलं आहे. या करारानुसार फिजी आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश गरज पडल्यानंतर परस्परांना संरक्षण सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी राजधानी सुवा येथे या करारावर स्वाक्षरी केली. फिजीने चीनपासून लांब जात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांसोबत जवळकी साधली आहे. या कराराचा भारत, QUAD आणि इंडो-पॅसिफिकच्या रणनितीवर काय परिणाम होईल जाणून घ्या.

ऑस्ट्रेलिया आणि फिजीमध्ये झालेला हा करार म्हणजे प्रशांत महासागर क्षेत्रात चीनचं वाढतं सैन्य आणि कूटनितीक हस्तक्षेप रोखण्यासाठी उचलण्यात आलेलं पाऊल आहे. या करारानुसार दोन्ही देश परस्पराच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असतील. संप्रभुतेला धोका निर्माण होईल अशा सुरक्षेसंबंधी कुठल्याही घटनाक्रमावर दोन्ही देश परस्परांशी सल्ला मसलत करतील.

तर अप्रत्यक्षपणे भारताचा विजय

भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया क्वाडचे सदस्य आहेत. क्वाडचा मुख्य उद्देश ‘फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक’ सुनिश्चित करणं आहे. ऑस्ट्रेलियाने जर, चीनला प्रशांत सागर क्षेत्रात सैन्य बेस बनवण्यापासून रोखलं, तर अप्रत्यक्षपणे भारताच्या इंडो-पॅसिफिक विजनचा विजय आहे. चीनचं नौदल प्रशांत महासागर क्षेत्रात अडकून पडलं तर हिंद महासागरात भारता दबदबा कायम राहीलं.

व्यापाराच्या दृष्टीने चांगली बाब काय?

प्रशांत महासागर क्षेत्र एक महत्वाचा व्यापारी मार्ग आहे. चीनने इथल्या बेटांवरील देशांवर आपलं सैन्य नियंत्रण स्थापित केलं, तर भविष्यात जागतिक पुरवठा साखळी आणि समुद्री मार्गांवर चीन अडथळा निर्माण करु शकतो. फिजी, वानुअतु आणि पपुआ न्यू गिनी या देशांचं पश्चिम देशांसोबत येणं ही व्यापारी मार्गांच्या स्वतंत्रतेसाठी चांगली बातमी आहे.

भारताच्या कूटनितीच्या दृष्टीने फायद्याची

भारत स्वत: प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांबरोबर आपले संबंध मजबूत बनवत आहे. ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन’च्या (FIPIC) माध्यमातून भारत या देशांना आरोग्य, आयटी, सौरऊर्जा क्षेत्रात मदत करत आहे. PM मोदी यांनी पापुआ न्यू गिनीचा दौरा सुद्धा केला आहे. या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाची मजबूती, भारताच्या कूटनितीच्या दृष्टीने फायद्याची आहे.

स्थिरता थेट भारतीय प्रवाशांच्या हिताची

फिजी सोबत भारताची दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंध आहेत. फिजीच्या एकूण लोकसंख्येमध्ये भारतीय वंशाचे 37 ते 40 टक्के लोक आहेत. फिजीची राजकीय आणि रणनितीक स्थिरता थेट भारतीय प्रवाशांच्या हिताची आहे. फिजी चीनच्या कर्जाच्या जाळ्यातून स्वत:ला वाचवून ऑस्ट्रेलिया सारख्या लोकशाही देशासोबत संरक्षण संबंध भक्कम करतो, त्यात त्या देशाचं आणि भारताचं सुद्धा हित आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?