गाझामध्ये पिठाची पोती घेऊन जाणाऱ्यांवर गोळीबार, 18 जणांचा मृत्यू
इराण युद्धानंतर इस्रायलने पुन्हा एकदा गाझाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली सैन्याने अलीकडेच गाझामध्ये पिठाची पोती घेऊन जाणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.

ही धक्कादायक घटना गाझामधून समोर आली आहे. इस्रायली सैन्याने अलीकडेच गाझामध्ये पिठाची पोती घेऊन जाणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा लोकांची गर्दी पॅलेस्टिनी पोलिसांकडून पिठाची पोती घेत होती जी मदत सामग्री लुटणाऱ्या टोळ्यांकडून जप्त करण्यात आली होती. इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, दरम्यान, इस्रायलने आता गाझाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता भीतीचे वातावरण आहे. इस्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. इस्रायलने आदल्या दिवशी मध्य गाझावर हल्ला करून 18 जणांना ठार केले होते.
इस्रायलने गुरुवारी मध्य गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात 18 जण ठार झाले. एका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. हल्ल्यानंतर गोंधळ उडाला आणि लोक सुखरूप बाहेर पडण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले.
मैदा घेणाऱ्या लोकांवर इस्रायलचा हल्ला
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा लोकांची गर्दी पॅलेस्टिनी पोलिसांकडून पिठाची पोती घेत होती जी मदत सामग्री लुटणाऱ्या टोळ्यांकडून जप्त करण्यात आली होती. सुमारे अडीच महिने गाझामधील सर्व अन्नसाहाय्य बंद केल्यानंतर इस्रायलने मे महिन्याच्या मध्यापासून थोड्या प्रमाणात पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. सशस्त्र टोळ्यांनी मदत सामग्री वाहून नेणारे ट्रक लुटल्याने संयुक्त राष्ट्रसंघाचे अन्नवितरण विस्कळीत झाले आहे.
आतापर्यंत 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा आणि इस्रायल यांच्यातील युद्धात 50,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने हजारो अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झाले
7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासचा नायनाट करण्याचा निर्धार केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून सुमारे 1200 लोकांना ठार मारले आणि 251 जणांना बंधक बनवले. या घटनेनंतर इस्रायल सातत्याने गाझावर कहर करत आहे.
ट्रम्प, नेतन्याहू, रुबिओ आणि डर्मर यांनी गाझामधील युद्ध संपवण्यासाठी आणि अब्राहम कराराचा विस्तार करण्याच्या व्यापक योजनेवर सहमती दर्शविली, असे इस्रायली वृत्तपत्र हयोमने म्हटले आहे. गाझा समस्येवर तोडगा म्हणून इस्रायलला भविष्यात पॅलेस्टिनी राष्ट्राला पाठिंबा देण्यास सांगितले जाईल, असा दावा हयोम यांनी केला आहे. अमेरिका वेस्ट बँकमधील अंशतः इस्रायलच्या सार्वभौमत्वाला मान्यता देईल. ही योजना वेगाने सुरू असल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. पहिली पायरी म्हणजे गाझामधील युद्ध दोन आठवड्यांत संपविणे. याची घोषणा लवकरच होऊ शकते.
