AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US चा सर्वात घातक बॉम्ब इराणच्या हाती ? इस्राईलने टाकला पण फुटलाच नाही, आता ट्रम्प परत मागताहेत…

इस्राईलने लेबनॉनवर जो एअर स्ट्राईक केला त्याने अमेरिकेला टेन्शन आलेले आहे. कारण या स्ट्राईक दरम्यान अमेरिकेने इस्राईलला दिलेला एक खतरनाक बॉम्ब न फुटताच तेथेच पडला आहे.

US चा सर्वात घातक बॉम्ब इराणच्या हाती ? इस्राईलने टाकला पण फुटलाच नाही, आता ट्रम्प परत मागताहेत...
GBU-39B Small Diameter Bomb (SDB)
| Updated on: Nov 29, 2025 | 5:12 PM
Share

अमेरिका सध्या खूप चिंतेत आहे. याचे कारण असा खतरनाक बॉम्ब, जो फुटलाच नाही आणि आता हा बॉम्ब चुकीच्या हातात जाण्याचा धोका वाढला आहे. लेबनॉनच्या हेजबुल्लाह असणाऱ्या भागात इस्राईलने स्ट्राईक दरम्यान एका अमेरिकन बॉम्बचा वापर केला होता. पण हा GBU-39B स्मॉल डायमीटर बॉम्ब (SDB) फुटलाच नाही. आणि बातम्यानुसार हा बॉम्ब सुरक्षितपणे इराण सापडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे इराण त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे कॉपी करण्यात जर यशस्वी झाला तर अमेरिकेची डोकेदुखी वाढणार आहे.

इराण करु शकतो रिव्हर्स इंजिनिअरिंग?

जर कोणी विचार करत असेल की इराण इतकी हाय टेक अमेरिकन टेक्नॉलॉजीला समजू शकणार नाही तर तो चुकीचा आहे. जूनमध्ये आलेल्या एका बातमीनुसार जेव्हा इस्राईलने इराणमध्ये ‘हर्मीस’ आणि FPV ड्रोनने हल्ला केला होता. त्यातील अनेक ड्रोन नष्ट झाले नव्हते. इराणने त्या ड्रोनना ताब्यात घेतले. आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे तसाच कॉपी करुन नवा ड्रोन तयार केला होता. आणि इराणचा हा नवा ड्रोन आता मूळ ड्रोनपेक्षा अधिक घातक म्हटला जात आहे. इराणने आधीही अमेरिकेच्या RQ-170 स्टेल्थ ड्रोनला कॉपी करुन स्टेल्थ ड्रोन बनवला आहे. त्यामुळेच जर हा GBU-39B बॉम्ब इराणच्या जवळ पोहचला तर तो त्याला ब्लुप्रिंट समजून त्याच प्रकारे स्मार्ट, लांबपल्ल्याचे, GPS-गायडेड मूनिशन तयार करु शकतो.

अमेरिकेने GBU-39B ला परत मागितले

मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेने लेबनॉन सरकारशी तात्काळ संपर्क करुन या न फुटलेल्या बॉम्बला पुन्हा परत मागितले आहे. अमेरिकेला हे म्युनिशन इराणपर्यंत पोहचेल केवळ हीच भीती नाही,तर चीन वा रशिया देखील याची रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे कॉपी करु शकतो अशीही भीती आहे. लेबनॉनच्या बातमीनुसार GBU-39B हा इस्राईलच्या त्या स्ट्राईकचा भाग होता. ज्यात हेजबोल्लाहचा गड हरात ह्रॅकला टार्गेट करण्यात आले होते. एक बॉम्ब फुटला नाही आणि त्याचे संपूर्ण सिस्टीम गायडन्स युनिट, GPS मॉड्यूल, इलेक्ट्रॉनिक्स जसेच्या तसे सापडले आहे.

GBU-39B बॉम्बची ताकत किती ?

हा एक 113 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब असून तांत्रिकदृष्ट्या खूपच उन्नत आहे. यात असे गायडन्स सिस्टीम आहेत जे हवामान किंवा धुराने प्रभावित होत नाही. आणि 40 नॉटिकल मैल दूरपर्यंत अचूकतेने टार्गेट नष्ट करु शकतो.हे तंत्रज्ञान अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराण वा त्यांच्या सहकाऱ्यापर्यंत पोहचू नये अशी अमेरिकेची इच्छा आहे. तर हा बॉम्ब इराणला मिळाला तर तो यास खोलून त्याच्या प्रत्येक पार्टची इंजिनिअरिंग समजू शकतो. आणि आपली मिसाईल आणि ड्रोन क्षमता अधिक पटीने वाढवू शकतो. इराणची ही क्षमता केवल अंदाज नसून अनेकदा सिद्ध झाली आहे. लेबनॉन सरकारने आतापर्यंत हा बॉम्ब त्यांच्याकडे आहे की नाही ते स्पष्ट केलेले नाही. तसेच तो अमेरिकेची विनंती कशी हँडल करणार हे त्याने स्पष्ट केलेले नाही.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.