US Tariff: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न पायाखाली चिरडलं, ‘ही’ गोष्ट खटकली
अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. अमेरिकेची वित्तीय कंपनी जेफरीजच्या एका अहवालात ट्रम्प यांनी वैयक्तित द्वेशातून हे पाऊल उचलले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत आहेत. अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. हा फक्त एक कर नसून ट्रम्प यांनी भारताविरोधत जाहीर केलेली नाराजी आहे, असं म्हटलं जात आहे. अशातच आता अमेरिकेची वित्तीय कंपनी जेफरीजच्या एका अहवालात ट्रम्प यांनी वैयक्तित द्वेशातून हे पाऊल उचलले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जेफरीजच्या अहवालात डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तानातील काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी इच्छुक होते. दशकांपासून सुरु असतेला हा वाद मिटवून डोनाल्ड ट्रम्प हे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवू इच्छित होते. मात्र भारताने ट्रम्प यांच्या मध्यस्थीला भारताने स्पष्टपणे नकार दिला होता. भारताचे ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न पायाखाली चिरडलं होतं, त्यामुळे ट्रम्प भारतावर संतापले होते.
भारत पाकिस्तान युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा दावा
मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. हे युद्ध रोखण्यात आपण महत्वाची भूमिका बजावली असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने असे स्पष्ट केले होते की, आम्ही कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मदतीने नव्हे तर थेट पाकिस्तानशी बोलणी करून युद्धबंदीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता यात ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नव्हती असं भारताने स्पष्ट केल्याने ट्रम्प चिडले असल्याचे समोर आले आहे.
भारताच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांचे स्वप्न भंगले
भारताने नेहमीच काश्मीरच्या मुद्द्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाने मध्यस्थी करु नये अशी भूमिका घेतलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र भारताने त्याला नकार दिला होता. जेफरीजच्या अहवालानुसार, याच कारणामुळे भारताला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र भारताने आपली भूमिका बदलली नाही. ज्यामुळे ट्रम्प यांच्या अहंकाराला धक्का बसला व त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी जगासमोर दावेदारी मांडता आली नाही व त्यांचे स्वप्न भंगले. त्यामुळेच अमेरिकेने भारतावर 50 टक्के लावण्याचा निर्णय घेतला आहे.
