वेळ आली तर अमेरिकेशीही संघर्ष करु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचं मोठं विधान

अमेरिका आणि इराणमध्ये 2015 चा अण्वस्त्र करार पुन्हा लागू करण्याबाबात चर्चा सुरु आहे. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतील हा करार दोन्ही देशांनी मान्य केला तर इराणवरील अनेक आर्थिक निर्बंध कमी होतील.

वेळ आली तर अमेरिकेशीही संघर्ष करु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 5:13 AM

जेरुसलेम : अमेरिका आणि इराणमध्ये 2015 चा अण्वस्त्र करार पुन्हा लागू करण्याबाबात चर्चा सुरु आहे. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतील हा करार दोन्ही देशांनी मान्य केला तर इराणवरील अनेक आर्थिक निर्बंध कमी होतील. मात्र, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू यांनी या कराराला विरोध केलाय. इराणकडून इस्राईलला असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेशी संघर्ष करायची वेळ आली तर तेही करु, असं सूचक विधान बेंजामिन यांनी केलंय. ते इस्राईलची गुप्तचर संस्था मोसादच्या नव्या प्रमुख डेविड बार्निया यांच्या स्वागत समारंभात बोलत होते (Israel opposing America Iran nuclear deal claiming threat to security).

बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “इराणमधील अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी इस्त्राईल अमेरिकेसोबत संबंध खराब होण्याचा धोकाही पत्करेल. अण्वस्त्र सज्ज इराण इस्राईलसाठी सर्वात मोठा धोका आहे. इस्त्राईल यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. मला आशा आहे की असं काही होणार नाही, पण जर इस्राईलला आपलं मित्र राष्ट्र अमेरिकेसोबत संघर्ष करणे किंवा इस्राईलच्या अस्तित्वाला धोका असणाऱ्याचा खात्मा यापैकी एक निवडण्याची वेळ आली तर इस्राईल दुसरा पर्याय निवडेल. इस्राईल अमेरिका-इराणमधील करार रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अमेरिका आणि इतर देश 2015 करार पुन्हा देण्यात यशस्वी झाले तरी इस्राईलचा विरोध कायम राहिल.”

इराणसह जगातील 6 शक्तीशाली देशांकडून अण्वस्त्र करारावर चर्चा

नेतन्याहू यांनी हे वक्तव्य अशावेळी दिलंय जेव्हा इराणसह जगातील 6 शक्तीशाली देश करारावर चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे जो बायडन यांनी आपल्या निवडणूक प्रचारात जाहीरपणे इराणसोबतचा अण्वस्त्र करार पुन्हा बहाल करण्याचं आश्वासन दिलं होतं. बराक ओबामा यांच्यानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हा अण्वस्त्र करार एकतर्फी असल्याचा आरोप करत रद्द केला होता. तसेच इराणवर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते.

नेतन्याहू यांचा कराराचा जोरदार विरोध

नव्याने इराण आणि अमेरिकेत याच करारावरुन चर्चा सुरु आहे. यानुसार अमेरिका इराणवरील आर्थिक निर्बंध हटवेल. त्याबदल्यात इराण आपल्या अण्वस्त्र निर्मितीवर प्रतिबंध लावेल. नेतन्याहू यांनी या कराराचा जोरदार विरोध केलाय. यावेळी त्यांनी अमेरिकेकडे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी पुरेसी संसाधनं नसल्याचा दावा नेतन्याहू यांनी केलाय.

हेही वाचा :

240 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्ध्वस्त, युद्धविरामानंतर नागरिक गाझाच्या रस्त्यांवर

हमासला पुढील 24 तासात इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धविरामाची आशा, मग अमेरिकेचा UN प्रस्तावाला विरोध का? वाचा सविस्तर

चिनी चॅनलकडून यहुदींवर ‘हे’ गंभीर आरोप, इस्राईलच्या राजदुताकडून आक्षेप, नव्या वादाचं कारण काय?

व्हिडीओ पाहा :

Israel opposing America Iran nuclear deal claiming threat to security

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.